परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी १८ मे रोजी खरीप शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. परंतु करोना रोगाचा प्राद्रुर्भाव व लॉकडाऊन परिस्थिती लक्षात घेता या वर्षी १८ मे रोजी ऑनलाईन खरीप शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठ निर्मित विविध पिकांच्या वाणांचे खरीप बियाणे मराठवाडयातील शेतक-यांना उपलब्ध होण्याच्या दृष्टीने विद्यापीठ कार्यक्षेञातील जिल्हयातील कार्यरत असलेल्या कृषि विज्ञान केंद्रे, संशोधन केंद्रे, कृषि महाविद्यालये यांचे मार्फत माहे जुन महिन्याच्या पहिल्या आठवडयात बियाणे विक्रीस उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती सहयोगी संचालक (बियाणे) यांनी दिली आहे.
बियाणे विक्री केद्रांची नावे खालीलप्रमाणे
परभणी येथील विद्यापीठातील बीज प्रक्रिया केंद्र, औरंगाबाद, बदनापुर (जिल्हा जालना), खामगांव (जिल्हा बीड) व तुळजापुर (जिल्हा उस्मानाबाद) येथील कृषि विज्ञान केंद्र तसेच कृषि महाविद्यालय, गोळेगांव (जिल्हा हिंगोली) व कृषि महाविद्यालय, अंबाजोगाई (जिल्हा बीड), नांदेड येथील कापुस संशोधन केंद्र व लातुर येथील गळीत धान्य संशोधन केंद्र या ठिकाणी बियाणे जुन महिन्याच्या पहिल्या आठवडयात विक्रीस उपब्लध होणार आहे.