भारतात देण्यात आलेल्या लसीकरण मात्रांची संख्या 18 कोटीच्या जवळ
भारतात कोरोना मुक्त झालेल्यांच्या एकूण संख्येने आज 2 कोटीचा टप्पा (2,00,79,599) पार केला आहे. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 83.50% आहे.
गेल्या 24 तासात 3,44,776 रुग्ण बरे झाले. गेल्या चार दिवसात सलग तिसऱ्यांदा, बरे झालेल्यांची संख्या ही कोरोना रुग्णांच्या दैनंदिन संख्येपेक्षा जास्त आहे.
नुकत्याच बरे झालेल्यांपैकी 71.16% हे दहा राज्यातले आहेत.
गेल्या 14 दिवसात बऱ्या झालेल्यांची संख्या खालील आलेख दर्शवतो.
भारतातली उपचाराधीन रुग्ण संख्या आज 37,04,893 पर्यंत घटली आहे. ही संख्या देशाच्या एकूण पॉझीटीव्ह रुग्णसंख्येच्या 15.41% आहे.
गेल्या 24 तासात उपचाराधीन रुग्ण संख्येत 5,632 ने घट झाली आहे.
देशातल्या उपचाराधीन रुग्णांपैकी 79.7% रुग्ण 12 राज्यात आहेत.
“संपूर्णतः सरकार” दृष्टीकोनाचा अवलंब करत, जागतिक पातळीवरून आलेल्या मदतीचे केंद्र सरकारकडून, राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना अतिशय त्वरेने वितरण जारी आहे. आतापर्यंत एकूण 9,294 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, 11,835 ऑक्सिजन सिलेंडर्स, 19 ऑक्सिजन निर्मिती संयंत्रे, 6,439 व्हेंटीलेटर्स/बाय पॅप आणि रेमडेसिवीर औषधाच्या सुमारे 4.22 लाख कुप्या रस्ते आणि हवाई मार्गाने वितरीत/ पाठवण्यात आल्या आहेत.
त्याचबरोबर कोविड -19 प्रतिबंधक लसीच्या आतापर्यंत देण्यात आलेल्या मात्रा आज 18 कोटीच्या जवळ पोहोचल्या आहेत.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार एकूण 26,02,435 सत्रांद्वारे 17,92,98,584 मात्रा देण्यात आल्या आहेत.
यामध्ये 96,18,127 आरोग्य कर्मचारी ( पहिली मात्रा ), 66,04,549 आरोग्य कर्मचारी (दुसरी मात्रा ), 1,43,22,390 फ्रंट लाईन कर्मचारी ( पहिली मात्रा ), 81,16,153 फ्रंट लाईन कर्मचारी(दुसरी मात्रा ), 18-45 वयोगटामधले 39,26,334 लाभार्थी ( पहिली मात्रा ) 45 ते 60 वयोगटातल्या 5,66,09,783 ( पहिली मात्रा ), आणि 85,39,763 लाभार्थी (दुसरी मात्रा) 60 वर्षावरील 5,42,42,792 लाभार्थी ( पहिली मात्रा ), 1,73,18,693 (दुसरी मात्रा ), यांचा समावेश आहे.
HCWs | 1st Dose | 96,18,127 |
2nd Dose | 66,04,549 | |
FLWs | 1st Dose | 1,43,22,390 |
2nd Dose | 81,16,153 | |
Age Group 18-44 years | 1st Dose | 39,26,334 |
Age Group 45 to 60 years | 1st Dose | 5,66,09,783 |
2nd Dose | 85,39,763 | |
Over 60 years | 1st Dose | 5,42,42,792 |
2nd Dose | 1,73,18,693 | |
Total | 17,92,98,584 |
देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या एकूण मात्रांपैकी 66.75% मात्रा दहा राज्यात देण्यात आल्या आहेत.
गेल्या 24 तासांत 18-44 वर्षे वयोगटाच्या 4,40,706 लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. आणि लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्यामध्ये 32 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण 39,26,334 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.
खाली दिलेल्या तक्त्यामध्ये 18 ते 44 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना आतापर्यंत दिल्या गेलेल्या एकूण मात्रा दर्शवण्यात आल्या आहेत.
S. No. | States | Total |
1 | A & N Islands | 1,175 |
2 | Andhra Pradesh | 2,153 |
3 | Assam | 1,48,136 |
4 | Bihar | 4,04,150 |
5 | Chandigarh | 2 |
6 | Chhattisgarh | 1,028 |
7 | Dadra & Nagar Haveli | 729 |
8 | Daman & Diu | 861 |
9 | Delhi | 5,23,094 |
10 | Goa | 1,757 |
11 | Gujarat | 4,19,839 |
12 | Haryana | 3,84,240 |
13 | Himachal Pradesh | 14 |
14 | Jammu & Kashmir | 30,169 |
15 | Jharkhand | 94 |
16 | Karnataka | 1,04,242 |
17 | Kerala | 1,149 |
18 | Ladakh | 86 |
19 | Madhya Pradesh | 1,36,346 |
20 | Maharashtra | 6,34,570 |
21 | Meghalaya | 6 |
22 | Nagaland | 4 |
23 | Odisha | 1,08,296 |
24 | Puducherry | 2 |
25 | Punjab | 5,755 |
26 | Rajasthan | 5,90,276 |
27 | Tamil Nadu | 26,467 |
28 | Telangana | 500 |
29 | Tripura | 2 |
30 | Uttar Pradesh | 3,15,928 |
31 | Uttarakhand | 67,427 |
32 | West Bengal | 17,837 |
Total | 39,26,334 |
गेल्या 24 तासात 20 लाखाहून अधिक मात्रा देण्यात आल्या.
लसीकरण अभियानाच्या 118 व्या दिवशी (13 मे 2021) ला 20,27,162 लसीकरण मात्रा देण्यात आल्या. यामध्ये 18,624 सत्रात 10,34,304 लाभार्थींना पहिली मात्रा आणि 9,92,858 लाभार्थींना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली.
Date: 13th May, 2021 (Day-118)
HCWs | 1stDose | 17,022 |
2ndDose | 33,409 | |
FLWs | 1stDose | 83,628 |
2nd Dose | 83,594 | |
18-44 years | 1st Dose | 4,40,706 |
45 to 60 years | 1stDose | 3,53,966 |
2nd Dose | 3,68,924 | |
Over 60 years | 1stDose | 1,38,982 |
2nd Dose | 5,06,931 | |
Total Achievement | 1stDose | 10,34,304 |
2ndDose | 9,92,858 |
खाली दिलेल्या तक्त्यात भारतात चाचण्यांमधील वाढ दर्शवण्यात आली असून आज ही संख्या 31 कोटीपेक्षा जास्त आहे.
खालील तक्त्यात दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर दर्शवण्यात आला असून या दरात थोडी घट होऊन तो 20.08% झाला आहे.
गेल्या 24 तासात 3,43,144 नव्या रुग्णांची नोंद झाली.
नव्या रुग्णांपैकी 72.37% रुग्ण, दहा राज्यांमध्ये आहेत
महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 42,582 नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली.त्यानंतर केरळमध्ये 39,955 तर कर्नाटकमध्ये 35,297 नव्या रुग्णांची नोंद झाली.
राष्ट्रीय मृत्यू दर सध्या 1.09%.आहे.
गेल्या 24 तासात 4,000 रुग्णांचा मृत्यू झाला
यापैकी 72.70% मृत्यू दहा राज्यात आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 850 जणांचा मृत्यू झाला, कर्नाटक मध्ये 344 जणांचा मृत्यू झाला.