गेल्या 24 तासात देशभरात सुमारे 2.69 लाख रुग्ण कोरोना मुक्त

15 कोटीहून अधिक लसीकरण मात्रा देत भारताने पार केला महत्वपूर्ण टप्पा

कोविड-19 साथीच्या आजाराविरुद्ध सुरु असलेल्या लढाईत आज भारताने महत्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे. भारतात  देण्यात येणाऱ्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांनी आज  15 कोटीचा टप्पा ओलांडला.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार भारतात 22,07,065 सत्राद्वारे लसीच्या 15,00,20,648 मात्रा देण्यात आल्या.

यामध्ये 93,67,520 आरोग्य कर्मचारी (पहिली मात्रा), 61,47,918 आरोग्य कर्मचारी (दुसरी मात्रा), 1,23,19,903 आघाडीचे कर्मचारी (पहिली मात्रा), 66,12,789 आघाडीचे कर्मचारी (दुसरी मात्रा), 60 वर्षावरील 5,14,99,834 लाभार्थी (पहिली मात्रा), 98,92,380  (दुसरी मात्रा), 45 ते 60 वयोगटातल्या 5,10,24,886  (पहिली मात्रा), आणि 31,55,418 लाभार्थी (दुसरी मात्रा )  यांचा समावेश आहे.

देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या एकूण मात्रांपैकी 67.18% मात्रा दहा   राज्यात देण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासात एकूण  21 लाखापेक्षा जास्त मात्रा देण्यात आल्या.

लसीकरण अभियानाच्या 103 व्या दिवशी (28 एप्रिल 2021) ला 21,93,281 लसीकरण मात्रा देण्यात आल्या. यामध्ये 20,944 सत्रात 12,82,135 लाभार्थींना पहिली मात्रा  आणि 9,11,146 लाभार्थींना लसीची दुसरी मात्रा  देण्यात आली.

 

भारतात एकूण 1,50,86,878 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 82.10% आहे.

गेल्या 24 तासात 2,69,507 रुग्ण कोरोनातून बरे झाले.

यापैकी 78.07% व्यक्ती दहा राज्यातल्या आहेत.

गेल्या 24 तासात 3,79,257 नव्या रुग्णांची नोंद झाली.

नव्या रुग्णांपैकी 72.20% रुग्ण, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, गुजरात आणि राजस्थान या दहा राज्यांमध्ये आहेत.

महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 63,309 नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर कर्नाटक 39,047 आणि केरळमध्ये 35,013 नव्या रुग्णांची नोंद झाली.

भारतात आज उपचाराधीन  रुग्णांची एकूण  संख्या  30,84,814 आहे. ही देशातल्या एकूण कोरोना बाधित रुग्णांच्या 16.55% आहे.

देशातल्या एकूण उपचाराधीन रुग्णसंख्येपैकी 78.26% रुग्ण 11 राज्यांमध्ये आहेत.

राष्ट्रीय मृत्यू दरात घट होत असून हा दर सध्या 1.11%  इतका आहे.

गेल्या 24 तासात 3,645 रुग्णांचा मृत्यू झाला

यापैकी 78.71% मृत्यू दहा राज्यात आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 1,035 जणांचा मृत्यू झाला, दिल्लीमध्ये 368 जणांचा मृत्यू झाला.

सहा राज्ये / केंद्र शासित प्रदेशात गेल्या 24 तासात कोविड -19 मुळे एकही मृत्यू झालेला नाही. यामध्ये दमण आणि दीव आणि दादरा नगर हवेली, लदाख (केंद्रशासित प्रदेश), लक्षदीप, मिझोरम, त्रिपुरा आणि  अरुणाचल प्रदेश  यांचा समावेश आहे.