सरकारी तसेच खाजगी रोजगाराच्या ठिकाणी कोविड -19 लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने जारी केले दिशानिर्देश
1 एप्रिल 2021 रोजी कोविड लसीकरणाची व्याप्ती 45 वर्षे किंवा त्याहून जास्त वयाच्या नागरिकांपर्यंत पोचवल्यावर मोठ्या प्रमाणावरील अर्थ व्यवस्थेच्या संघटित क्षेत्रात कार्यरत असणारे नागरिक तसेच उत्पादन किंवा सेवाक्षेत्रासारख्या खाजगी व सरकारी क्षेत्रात रोजगार असणाऱ्या व्यक्तींपर्यंत लसीकरण पोहोचवण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
आता सरकारी तसेच खाजगी क्षेत्रातील किमान शंभर पात्र आणि इच्छुक लाभार्थी असणाऱ्या रोजगाराच्या ठिकाणी कोविड -19 लसीकरण सत्रे आयोजित करता येतील असे आरोग्यमंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कळवले आहे. कार्यान्वयित असलेल्या कोविड -19 लसीकरण केंद्राच्या उपाधीखालीसुद्धा ही सत्रे आयोजित करता येतील. या कामासाठी राज्यांना सहाय्यकारी ठरणारे दिशानिर्देश केंद्राने तयार केले आहेत आणि आणि केंद्रीय आरोग्य सचिवांनी ते सर्व राज्यांना तसेच केंद्रशासित प्रदेशांना कळवले आहेत. राज्य आणि जिल्हा पातळीवरच्या कार्यक्रम प्रशासकांना आवश्यक ती माहिती असणारे हे दिशानिर्देश खाजगी आणि सार्वजनिक रोजगाराच्या ठिकाणी लसीकरण सत्रे आयोजित करण्यासाठी सहाय्यकारी ठरतील आणि अशा प्रकारची रोजगाराच्या ठिकाणांची लसीकरण केंद्रे सर्व राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात 11 एप्रिल 2021 पासून सुरू करता येतील.
योग्य त्या विचारविनिमयासह खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील रोजगारदात्यांना तसेच व्यवस्थापकांना रोजगाराच्या ठिकाणी लसीकरण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तयारी करण्याचे निर्देश राज्यांनी द्यावेत असेही यात म्हटले आहे.
केंद्र सरकार सातत्याने राज्य आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनाबरोबर संपर्कात असून लसीकरण मोहीम ही अधिक व्यावहार्य आणि स्वीकारार्ह तसेच लाभार्थींना उपयुक्त व्हावी या दृष्टीने प्रयत्नशील आहे.
खाजगी व सरकारी रोजगाराच्या ठिकाणी कोविड-19 लसीकरण सत्रांचे नियोजन आणि कार्यांन्वयन करण्यासाठी सविस्तर परिचालन मार्गदर्शक तत्वे तसेच मानक परिचालन प्रक्रिया यासंदर्भातील केंद्राचे दिशानिर्देश पुढीलप्रमाणे
https://www.mohfw.gov.in/pdf/COVID19VaccineOG111Chapter16.pdf