कोरोना लसीकरण : भारत जगात दुसर्‍या क्रमांकावर

महाराष्ट्र, पंजाब, छत्तीसगड, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश या सहा राज्यांत नवीन कोविड रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ नोंदवली जात आहे. नवीन प्रकरणांपैकी 79.57% रुग्ण या सहा राज्यातले आहेत.

गेल्या 24 तासांत 62,258 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

महाराष्ट्रात आतापर्यंतच्या सर्वाधिक दैनंदिन नवीन रुग्णांची 36,902 नोंद झाली आहे. त्याखालोखाल पंजाबमध्ये 3,122 तर छत्तीसगडमध्ये 2,665. नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत.

 

खाली नमूद केलेली दहा राज्ये दैनंदीन नवीन प्रकरणांमधे चढता आलेख दर्शवत आहेत.

भारतातील एकूण सक्रिय रुग्णसंख्या आज 4,52,647 वर पोहोचली आहे. भारताच्या आतापर्यंतच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण 3.8% आहे. गेल्या 24 तासांत एकूण सक्रिय रुग्णसंख्येचा विचार करता 31,581 नव्या प्रकरणांची नोंद झाली आहे.

 

देशातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी महाराष्ट्र, केरळ व पंजाब या राज्यांमधे 73% रुग्ण आहेत.

दुसरीकडे, भारतात आतापर्यंत 5.8 कोटींपेक्षा जास्त व्यक्तींचे लसीकरण झाले आहे.

 

आज सकाळी सात वाजेपर्यंत 5.81 कोटी (5,81,09,773) जणांचे 9,45,168 सत्रांमधे लसीकरण झाल्याचे संबंधित अहवालात म्हटले आहे. या अंतर्गत 80,96,687 आरोग्य क्षेत्रातले कर्मचारी (पहिला डोस), 51,44,011, आरोग्य क्षेत्रातले कर्मचारी (दुसरा डोस), 87,52,566 आघाडीवर कार्यरत कर्मचारी (पहिला डोस) आणि 35,39,144 आघाडीवर कार्यरत कर्मचारी (दुसरा डोस), 61,72,032 लाभार्थी विशिष्ट आजार असलेले 45 वर्षांपेक्षा जास्त (पहिला डोस) आणि 60 वर्षांहून अधिक वयाचे लाभार्थी 2,64,05,333 यांचा समावेश आहे.

भारत लसीकरणाबाबत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. (25 मार्च 2021 रोजीच्या नोंदीनुसार)

खालील आलेखात भारत आणि इतर देशांमधल्या लसीकरण मोहिमेची तुलना दर्शवली आहे.

आतापर्यंत भारतात देण्यात आलेल्या एकूण लसींपैकी 60 टक्के हिस्सा आठ राज्यांचा आहे. महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि गुजरातने 50 लाख लसीकरणाचा टप्पा ओलांडला आहे.

लसीकरण मोहिमेच्या 70 व्या दिवशी  (दि. 26 मार्च 2021) 26,05,333 जणांचे लसीकरण झाले आले. त्यापैकी 24,25,146 लाभार्थ्यांना 43,281 सत्रांमध्ये लसीचा पहिला डोस देण्यात आला आणि 1,80,187 आरोग्य क्षेत्रातले कर्मचारी तसेच आघाडीवर कार्यरत कर्मचारी यांना लसीचा दुसरा डोस मिळाला.

लसीकरणाच्या दैनंदिन सरासरीत निरंतर वाढ दिसून येत आहे.

भारतात आजपर्यंत एकूण 1,12,95,023 कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनामुक्तीचा राष्ट्रीय दर 94.84% आहे.

गेल्या 24 तासांत 30,386 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

महाराष्ट्रात नव्याने नोंद झालेल्या एका दिवसात सर्वाधिक कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 17,019 नोंदली गेली आहे.

गेल्या 24 तासांत 291 मृत्यूंची नोंद झाली.

कोरोनामुळे झालेल्या नवीन मृत्यूंमधे पाच राज्यांचा वाटा 75.6% आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक (112) मृत्यू, त्यापाठोपाठ पंजाबमध्ये एका दिवसात 59 मृत्यू झाले आहेत.

 

चौदा राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधे गेल्या 24 तासांत एकाही कोविड-19 मृत्यूची नोंद झाली नाही. यात आसाम, ओदिशा, पुदुचेरी, लडाख (केंप्र), दिव-दमण, आणि दादरा-नगर हवेली, लक्षद्वीप, मणिपूर, त्रिपुरा, सिक्कीम, मेघालय, मिझोरम, आंदमान निकोबार बेटे, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश यांचा समावेश आहे.