Video : गारपिटीने मोडला पिकांचा कणा, उमेदही मातीमोल झाली…

गेल्या दोन दिवसात धुळे  जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीने अक्षरशः झोडपून काढले आहे … दुर्दैव म्हणजे याही वेळी तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.

धुळे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात पडलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने होत्याचे नव्हते केले आहे . या अवकाळीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. साक्री तालुक्यातील धमनार येथील राजेंद्र देवरे त्यांनी शेतात टमाटे आणि मिरचीची लागवड केली. चार एकर क्षेत्रात लाखोंचा खर्च करून पीक लावलं आणि जगवलं. मात्र  गेल्या दोन दिवसापासून पुन्हा गारपीट आणि अवकाळी पाऊस टमाटे आणि मिरचीच्या पिकाला झोडपून काढत आहे. पिकांचा कणा तर मोडला सोबत राजेंद्र यांची उमेदही मातीमोल झाली आहे.

सोनवणे या धमनारच्या शेतकऱ्याची हि गत काही वेगळी नाही. त्यांनी ५ एकरात कांदा लावला होता. तो गारपिटीमुळे हातचा गेला. शासकीय यंत्रणा येतात, पंचनामे होतात, घोषणा होतात, मात्र मदत मिळत नाही.

 

धुळे जिल्ह्यात गहू , ज्वारी.. हरभरा … मिरची … कांदा … फळबागा असं जे जे शेतात उभं होत ते ते माती झालं आहे … मिरची आगार असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात तर शेतकरी उद्धवस्त झाला आहे … लोकप्रतिनिधींचे दिलासा देणारे दौरे सुरु झाले आहे … मदतीच्या आश्वासनांचा पासून स्थानिक पातळीवर वेगळा पडत आहे.