किमान आधारभूत किमतीने धान्यखरेदी

वर्ष 2017-18 ते 2020-21 या कालावधीत एकूण धान्य उत्पादन, या धान्याची आधारभूत किमतीने केलेली खरेदी आणि त्या खरेदीचा लाभ झालेल्या शेतकऱ्यांची एकूण संख्या ही  Annexure-I. मध्ये दाखवली आहे. आधारभूत किमतीच्या माध्यमातून खरेदी प्रक्रियेत सरकारचा हस्तक्षेप हा त्या प्रक्रियेत सहभागी नसलेल्या शेतकऱ्यांनाही लाभदायक ठरला. कारण सरकारने जाहीर केलेल्या आधारभूत किमतीं तसेच सरकारच्या खरेदी प्रक्रियेची दखल घेत बाजारपेठेने विविध नोंदणीकृत धान्याची  खुल्या बाजारातील खरेदी ही आधारभूत किंमत वा त्याहून जास्त किमतीने केली. त्यामुळे आधारभूत किमतीचा लाभ झालेल्या शेतकऱ्यांची योग्य आकडेवारी काढणे हे जिकीरीचे काम आहे.

गोदामे विकास व नियमन प्राधिकरणाच्या (WDRA)  अख्यतारीतील नोंदणीकृत गोदामे , त्याची 17.03.2021 रोजी वर्षनिहाय साठवणक्षमता आणि एकात्मिक बागायती विकास योजनेंतर्गत (MIDH)  असलेल्या शीतगृहांचा 31312.2020 पर्यंतचा राज्यनिहाय तपशील हा  Annexure-II & III मध्ये आहे.

ही माहिती कृषी आणि शेतकरी कल्याण खात्याचे केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली.