देशात 373 किसान रेल्वे सेवा कार्यरत

शेतकऱ्यांना किसान रेल्वेचे फायदे

शेतकऱ्यांना आपल्या कृषी मालासाठी सुलभरीत्या वाहतूक व्यवस्था उपलब्ध व्हावी या उद्देशाने रेल्वे प्रशासनाने किसान रेल सेवा सुरु केली. बहुतांश सेवा या देवळाली, सांगोला, सांगली, येवला, नगरसोल, डहाणू रोड, धोराजी, महुवा इत्यादी सारख्या कृषी विभागात येणाऱ्या लहान स्थानकांमधून सुरू केल्या आहेत. कृषी मालाची चढ-उतार करण्यासाठी किसान रेल्वेला पुरेसे थांबे देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, या योजनेचा लाभ छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना देखील मिळावा यासाठी किसान रेल्वे सेवेत नोंद करण्यासाठी कोणतीही किमान मर्यादा नाही. 12 मार्च 2021 पर्यंत 43 मार्गांवर सुमारे 373 किसान रेल्वे सेवा कार्यरत होत्या ज्यामधून  अंदाजे 1.2 लाख टन शेतमालाची वाहतूक झाली.

रेल्वे, वाणिज्य व उद्योग आणि ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली.