कोरोना लसीकरण: 3 कोटीच्या टप्याकडे भारताची वाटचाल

महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडूमध्ये कोविडच्या दैनंदिन रुग्ण संख्येत वाढ सुरूच

महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये  कोविडच्या दैनंदिन रुग्ण संख्येत वाढ सुरूच आहे. गेल्या 24 तासात नोंदवल्या गेलेल्या रुग्ण संख्येपैकी 78.41% रुग्ण या पाच राज्यातले आहेत.

गेल्या 24 तासात 26,291 नव्या रुग्णांची नोंद झाली.

महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 16,620 (दैनंदिन नव्या रुग्णांच्या 63.21%) नव्या रुग्णांची नोंद झाली. केरळ 1,792 तर पंजाबमध्ये  1,492 नव्या रुग्णांची नोंद झाली.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001859I.jpg

भारतातली एकूण सक्रीय रुग्ण संख्या आज 2,19,262 असून ही भारताच्या एकूण पॉझीटीव्ह रुग्णसंख्येच्या 1.93% आहे.

देशाच्या एकूण सक्रीय रुग्ण संख्येपैकी 77% महाराष्ट्र, केरळ आणि पंजाब या तीन राज्यात आहे.

देशाच्या एकूण सक्रीय रुग्ण संख्येपैकी  58% पेक्षा जास्त केवळ महाराष्ट्रात आहेत.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004R7LU.jpg

दुसरीकडे कोविड प्रतिबंधक लसीकरण मात्रेच्या एकूण 3 कोटीच्या टप्याकडे भारताची झपाट्याने वाटचाल सुरु आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image005QWJJ.jpg

आज सकाळी सात वाजता प्राप्त झालेल्या अहवालानुसार 2,99,08,038 लसीच्या मात्रा 5,13,065 सत्राद्वारे देण्यात आल्या.

भारतात आतापर्यंत 1,10,07,352  रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 96.68% आहे.

गेल्या 24 तासात  17,455  रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. नुकतेच बरे झालेल्यापैकी 84.10% जण 6 राज्यातले आहेत.

महाराष्ट्रातएका दिवसात सर्वात जास्त म्हणजे 8,861  रुग्ण कोरोना मुक्त झाले.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image006J3XU.jpg

गेल्या 24 तासात 118 मृत्यू झाले. यापैकी  82.20% मृत्यू सहा राज्यातले आहेत.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image007O3DN.jpg

महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 50 मृत्यूंची नोंद झाली.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0024LRB.jpg     https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0032RMG.jpg