नाशिक : पिंपळगाव बसवंत येथील चिंचखेड चौफुली येथे रहाणाऱ्या विश्राम फुगट, प्रशांत फुगट, प्रवीण शिरसाठ या व्यापाऱ्यांनी भेंडाळी येथील सहा शेतकऱ्यांच्या द्राक्षबाग खरेदी करून साडेबारा लाख रुपयांना गंडा घातला आहे. यासंदर्भात सायखेडा पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांना अर्ज देऊन गुन्हा दाखल करावा असे निवेदन देण्यात आले.
भेंडाळी येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी बाजीराव कमानकर यांचे 90 क्विंटल 250000रु किमतीची द्राक्ष खरेदी केले आहे. तसेच संदीप सातपुते 125 क्विंटल यांचे 325000 रुपये किंमतिचे खरेदी केले आहे, तर सोमनाथ जाधव यांचे 85क्विंटल 22500किंमतीचे, मधुकर सातपुते यांचे 80क्विंटल 200000 इतके आणि शैलेश शिंदे यांचे 35 क्विंटल 110000रुपये आणि किरण पोटे यांचे 52क्विंटल 125000रु किमतीचे द्राक्ष पिंपळगाव बसवन्त येथील विश्राम फुगट, प्रशांत फुगट, प्रवीण शिरसाठ यांनी द्राक्ष खरेदी केले यावेळी बाग संपला की पैसे देऊ असे सांगितले होते भरवसा म्हणून त्यासाठी प्रशांत फुगट यांनी विश्राम फुगट यांच्या नावाचा बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचा धनादेश दिला आहे.
शेतकऱ्यांना वारंवार पैसे आज देतो उद्या देतो अशी असे आश्वासन देत राहिला कधी पिंपळगाव तर कधी भेंडाळी येथे येतो असे सांगून दिशाभूल करत राहिला अनेक दिवस व्यापारी आपले पैसे देईल या आशेवर शेतकरी राहिले मात्र दोन दिवसापासून कोणताही प्रतिसाद देत नसल्याने शेतकऱ्यांनी अखेर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
द्राक्षाचे पडलेले दर आणि वाढता खर्च याचा अगोदर ताळमेळ बसत नाही त्यात व्यापाऱ्यांनी अशी फसवणूक केल्याने शेतकरी पुरता खचून जात आहे वाढतें कर्ज, बायकोचे आईचे दागिने गहाण ठेऊन बागाला खर्च केला आज व्यापारी लुटत आहे शेतकऱ्यांनी जगाव तरी कस असा प्रश्न उभा राहिला आहे.
व्यापारी पैसे देत नसल्याचे स्पष्ट झाले आहे आत्ता आमचे भिस्त सायखेडा पोलीस यांच्यावर त्यांनी फास्ट तपास करून शेतकऱ्यांना पैसे मिळवून द्यावे आणि या अडचणीत शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी ठेवली आहे.
आईचे आणि पत्नीचे दागिने गंगाभीसन भुतडा पतसंस्था येथे गहाण ठेऊन भांडवल उभे केले होते मागील वर्षी लॉकडाउन मध्ये बाग सापडली होती त्यामुळे अवघ्या 3रु किलो दराने बेदाणा बनविण्यासाठी द्राक्ष गेले यंदा चार पैसे मिळतील अशी अशा होती मात्र व्यापारी पैसे देत नसल्याने सर्व अपेक्षा मावळल्या आहेत, अशा भावना शेतकरी संदीप सातपुते यांनी बोलून दाखवली.