खरीप हंगामा दरम्यान आतापर्यंत 673.53 लाख मेट्रिक टन धान खरेदी

26,719.51कोटी मूल्याच्या 91,86,678  कापूस गाठींची खरेदी, 18,97,002 शेतकऱ्यांना फायदा

चालू खरीप विपणन हंगाम (केएमएस) 2020-21 मध्ये, सरकर मागील हंगामांप्रमाणेच शेतकऱ्यांकडून किमान हमी भावने धान्य खरेदी करत आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0013X8Z.png

खरीप विपणन हंगाम 2020-21 मध्ये धानाची खरेदी सातत्याने होत आहे. पंजाब, हरयाणा, उत्तरप्रदेश, तेलंगणा, उत्तराखंड, तामिळनाडू, चंडीगड, जम्मू-काश्मीर, केरळ, गुजरात, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, ओदिशा, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, बिहार, झारखंड, आसाम, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये 08 मार्च 2021 पर्यंत 673.53 लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त तांदळाची खरेदी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळातील 589.46 लाख मेट्रिक टन तांदूळ खरेदीमध्ये यावर्षी 14.26 % वृद्धी झाली आहे. 673.53 लाख मेट्रिक टन एकूण खरेदीपैकी केवळ पंजाबने 202.82 लाख मेट्रिक टन धान खरेदी केले असून ते एकूण खरेदीच्या 30.11 टक्के आहे.

आतापर्यंत 1,27,164.08 कोटी रुपयांची खरेदी करण्यात आली असून 98.55 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002BBXI.png    https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003H7Q2.png

राज्यांकडून आलेल्या प्रस्तावाच्या आधारे तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात, हरियाणा, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, ओदिशा, राजस्थान आणि आंध्रप्रदेश या राज्यांसाठी मूल्य समर्थन योजनेंतर्गत  (पीएसएस) खरीप विपणन हंगाम 2020-21 आणि रब्बी विपणन हंगाम 2021  च्या डाळी आणि तेलबियांच्या 94.39 लाख मेट्रिक टन एवढ्या खरेदीस मान्यता देण्यात आली आहे. यानंतर आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ राज्यांसाठी सुक्या खोबऱ्याच्या (बारमाही पीक) 1.23 लाख मेट्रिक टन खरेदीस मंजुरी देण्यात आली आहे. पुढे, राज्य/केंद्र शासित प्रदेशांना पीएसएस अंतर्गत डाळी, तेलबिया आणि सुक्या खोबऱ्याच्या खरेदीचा प्रस्ताव मिळाल्यानंतर त्यांना परवानगी दिली जाईल. जर केंद्रिय मध्यवर्ती एजन्सीकडून जाहीर झालेल्या आणि राज्य सरकारने नामनिर्देशित केलेल्या एजन्सीमार्फत दिल्या जाणाऱ्या खरेदी दरापेक्षा बाजारातील  किमती कमी झाल्या तर एफएक्यू ग्रेडच्या पिकांची खरेदी थेट नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून सन 2020–21 साठी अधिसूचित खरेदी किमान आधारभूत किंमतीनुसार  करता येईल.

08 मार्च 2021 पर्यंत, नोडल संस्थेच्या माध्यमातून सरकारने  3,12,421.02  मेट्रिक टन मूग, उडीद, तूर, हरभरा, शेंगदाणे आणि सोयाबीन खरेदी केला आहे, किमान आधारभूत किंमतीनुसार खरीप 2020-21 आणि रब्बी 2021 साठी  1,681.70 कोटी रुपये मूल्य  खरेदीचा लाभ तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, उत्तरप्रदेश, हरियाणा आणि  राजस्थान मधील 1,69,704 शेतकऱ्यांना झाला आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004RKDW.png     https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image005RIEJ.png

त्याचप्रमाणे, 08 मार्च 2021 पर्यंत 52.40 कोटी रुपये मूल्याचे 5,089 मेट्रिक टन सुके खोबरे (बारमाही पीक) खरेदी करण्यात आले आहे. कर्नाटक आणि तामिळनाडू मधील 3,961  शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आहे. संबंधित राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकार कडधान्ये व तेलबिया यांच्या आवकेनुसार संबंधित राज्यांनी ठरविलेल्या  तारखेपासून खरेदी सुरू करण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था करीत आहेत.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0063CDQ.png

किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, आंध्रप्रदेश, ओदिशा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये कापसाची खरेदी प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. 08 मार्च 2021 पर्यंत 26,719.51 कोटी रुपये किमतीच्या 91,86,678 कापसाच्या गाठी खरेदी करण्यात आला  असून 18,97,002 शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे.