सप्टेंबर 2020 पासून खर्चाची प्रतिपूर्ति देणार
मुंबई, दि. 10- कोरोनाची लागण झाली आहे, अशा एसटी महामंडळातील अधिकारी-कर्मचा-यांनाहीआता वैद्यकिय उपचाराचा खर्च मिळणार आहे. 2 सप्टेंबर 2020 पासून वैद्यकिय उपचारासाठीझालेल्या खर्चाची प्रतिपूर्ती देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. सरकारी कर्मचा-यांच्या विविध आजारांच्या उपचारांसाठी होणा-यावैद्यकिय खर्चाची प्रतिपूर्ती सरकारकडून केली जाते.
अशा विविध 27 आकस्मिक आजारांमध्येकोविड-19 या आजाराचा नुकताच समावेश करण्यात आला आहे. शासनाने दिलेल्या मान्यतेनुसारवैद्यकिय प्रतिपूर्तीसाठी वेळोवेळी केलेले बदल हे राज्य परिवहन महामंडळासाठीही लागूकरण्यात आले आहेत. त्यानुसार एसटी महामंडळातील अधिकारी-कर्मचारी व त्यांचे कुटुंबियकोविडचा संसर्ग होऊन आजारी पडल्यास त्यासाठी होणा-या वैद्यकिय खर्चाची प्रतिपूर्तीमहामंडळाकडून देण्यात येणार आहे. हा निर्णय 2 सप्टेंबर 2020 पासून पूर्वलक्षी प्रभावानेलागू राहील. या संदर्भातील परिपत्रक कर्मचारी वर्गाचे महाव्यवस्थापक माधव काळेयांनी जारी केले आहे.