चालू साखर हंगाम 2020-21 मध्ये देशातील साखरेचे उत्पादन अंदाजे 310 लाख मेट्रिक टन तर देशांतर्गत सेवन 260 लाख टन राहण्याचा अंदाज आहे. 28.फेब्रुवारी 2021 पर्यंत देशांतर्गत साखर कारखान्यांकडून 222 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन झाले आहे.
साखरेच्या अतिरिक्त साठ्याचा विनियोग करण्यासाठी चालू साखर हंगामादरम्यान प्रत्येक कारखान्यानुरूप 60 लाख मेट्रिक टन निर्यात कोटा ठरवून दिला आहे. याखेरीज बी-हाय गूळ, शुगर सिरप, इथेनॉल निर्मितीसाठी सरकार साखर कारखान्यांना प्रोत्साहन देत आहे.
साखर कारखान्यांपुढचा अतिरिक्त साखरेचा प्रश्न सोडवण्यासाठी, विविध कच्च्या मालापासून तयार होणाऱ्या इथेनॉलसाठी प्रोत्साहन म्हणून पारिश्रमिक मूल्य सरकारने निश्चित केले आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.