गेल्या 24 तासात सुमारे 14 लाख लोकांचे लसीकरण

देशभरात 1.8 कोटीहून अधिक कोविड 19 प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले

अंदाजित अहवालानुसार आज सकाळी 7 वाजेपर्यंत देशात   1.8 कोटीहून अधिक (1,80,05,503) कोविड 19 प्रतिबंधक लसीचे डोस दिल्याची नोंद झाली आहे.

यामध्ये  68,53,083 एचसीडब्ल्यू (पहिला डोस), 31,41,371 एचसीडब्ल्यू (दुसरा डोस),  60,90,931 एफएलडब्ल्यू (पहिला डोस) आणि  67,297 एफएलडब्ल्यू (दुसरा डोस), तसेच विशिष्ट सह-विकार असलेले  45 वर्षांहून अधिक वयोगटातील 2,35,901 लाभार्थी . (1 ला डोस) आणि 60 वर्षांहून अधिक वयोगटातील 16,16,920 लाभार्थींचा  समावेश आहे.

तर दुसरीकडे, महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, गुजरात, मध्य प्रदेश  आणि दिल्ली या सहा राज्यांत गेल्या  24 तासांत दररोज नवीन मोठ्या संख्येने नवे रुग्ण आढळून येत आहेत.  गेल्या  24 तासांत  नोंद झालेल्या नवीन रुग्णांपैकी 84..44% या सहा राज्यांमधील आहेत.

महाराष्ट्रात कालही 8,998 इतक्या सर्वाधिक संख्येने नवे रुग्ण आढळले आहेत.  त्याखालोखाल केरळमध्ये 2,616 आणि पंजाबमध्ये 1,071 नवीन रुग्णांची  नोंद झाली.

देशाचा एकूण सकारात्मकता दर सातत्याने घसरत आहे. आज हा दर 5.08 % आहे. आठ राज्यांनी  राष्ट्रीय सरासरीपेक्षा (2.09%) जास्त साप्ताहिक सकारात्मकता दर दर्शवला आहे.  त्यापैकी महाराष्ट्रात साप्ताहिक सकारात्मकतेचा दर 10.38 टक्के  आहे.

गेल्या  24 तासांत 113 मृत्यूची  नोंद झाली आहे.  नवीन मृत्यूंपैकी  88.5 टक्के मृत्यू सहा राज्यांमधील आहेत.  महाराष्ट्रात सर्वाधिक 60 मृत्यूंची नोंद झाली.