कृषी हवामान सल्ला; १८ ते २३ फेब्रुवारी

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवसात दिनांक 18 फेब्रूवारी 2021 रोजी  उस्मानाबाद, लातुर, औरंगाबाद, जालना, नांदेड जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व पावसासह  काही ठिकाणी  गारपीट होण्याची शक्यता आहे, तसेच बिड व परभणी जिल्हयात काही ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. दिनांक 19 फेब्रूवारी 2021 रोजी औरंगाबाद, जालना व बिड जिल्हयात एक किंवा दोन ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठपरभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व पावसासह  तुरळक ठिकाणी  गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या रब्‍बी ज्‍वारी, हरभरा आणि ऑक्‍टोबरमध्‍ये लागवड केलेला गहु या पिकांची लवकरात लवकर काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. ही पिके काढणी केली असल्‍यास ढीग तयार करून ती ताडपत्रीने झाकावीत. मळणी केलेला शेतमालाची  सुरक्षित ठिकाणी साठवण करावी. उशिरा पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकावर माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी डायमेथोएट 30% ईसी 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावीढगाळ वातावरण, आर्द्रता व काही ठिकाणी झालेल्या पावसामुळे उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकात तांबेरा रोगाचा प्रादर्भाव दिसून आल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी झायनेब किंवा मॅन्कोझेब (75 डब्ल्यूपी) 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गव्हाच्या पिकात उंदरांचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या नियंत्रणासाठी  झिंक फॉस्फाईड 1 भाग + गुळ 1 भाग + 50 भाग गव्हाचा भरडा व थोडसे गोडतेल मिसळून हे मिश्रण उंदराच्या बिळात टाकुन बिळे बंद करावीत. सध्‍याच्‍या काळात वेळेवर लागवड केलेल्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरू आहेत. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व पावसासह  तुरळक ठिकाणी  गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, हळदीची उघडयावर साठवण करू नये.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व पावसासह  तुरळक ठिकाणी  गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, जुन मध्‍ये लागवड केलेल्‍या  केळीच्या बागेत केळीचे झाड कोलमडु नये म्‍हणुन झाडास आधार दयावा. ढगाळ वातावरण, आर्द्रता व काही ठिकाणी झालेल्या पावसामुळे मृग बाग लागवड केलेल्या केळी बागेत सिगाटोगा रोगाच्या व्यवस्थापनासाठी प्रोपीकोनाझोल 10 मीली + स्टिकर प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पाउस, वारा यामुळे बागेत पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत.ढगाळ वातावरण, आर्द्रता व काही ठिकाणी झालेल्या पावसामुळे आंबा बागेत भुरी व करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी हेक्झाकोनेझॉल पाच मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वारणी करावी. आंब्यामध्ये मोहोर फुलण्याच्या अवस्थेमध्ये शक्यतो फवारणी टाळावी जेणेकरून परागीकरणावर परिणाम होणार नाहीगरज पडल्यासच तुडतूडयांच्या व्यवस्थापनासाठी % निंबोळी अर्क अथवा थायमिथाक्झाम 25 % दोन ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावीपाउस, वारा यामुळे मोडलेल्या फांद्यांची छाटणी करावी. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व पावसासह  तुरळक ठिकाणी  गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्‍या द्राक्षांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवण करावी.पाउस, वारा यामुळे द्राक्ष बागेत पडलेले व प्रादुर्भावग्रस्त घड गोळा करून नष्ट करावीत. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व पावसासह  तुरळक ठिकाणी  गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्‍या संत्रा/मोसंबी फळांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवण करावी.  पाउस, वारा यामुळे बागेत पडलेली संत्रा / मोसंबीची फळे गोळा करून नष्ट करावीत. तसेच मोडलेल्या फांद्यांची छाटणी करून त्यावर 1 % बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. संत्रा / मोसंबी फळ बागेत नागअळीचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रीड 17.8 % 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.पाउस, वारा यामुळे बागेत मोडलेल्या फांद्यांची छाटणी करून त्यावर 1 % बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.

भाजीपाला पिके

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व पावसासह  तुरळक ठिकाणी  गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची तसेच टरबूज, खरबूज इत्यादी पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवण करावी. मिरची पिकात भुरी रोगाचा  प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी  मायक्लोब्युटनिल 10% डब्लूपी  10 ग्राम  प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  पाउस, वारा यामुळे प्रादुर्भावग्रस्त भाजीपाला गोळा करून नष्ट करावा.

फुलशेती व्‍यवस्‍थापन

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व पावसासह  तुरळक ठिकाणी  गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्‍या फुलपिकांची काढणी व प्रतवारी करून, ती बाजारपेठेत विक्रीस पाठवावी.

पशुधन व्‍यवस्‍थापन

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व पावसासह  तुरळक ठिकाणी  गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी. जनावरांच्‍या गोठयाच्‍या छतावर ऊसाचे पाचट किंवा तुराटयाचे आच्‍छादन करावे. तसेच पाऊस चालू होण्‍याच्‍या  वेळी झाडाच्‍या आडोशाला थांबु नये. जनावराच्या शरीरावर गारांचा मार लागल्यामुळे जखमा झाल्या असल्यास, जखमांचे स्वरूप पाहुण त्या पोटॅशियम परमँगनेटच्या द्रावणाने किंवा आयोडीनच्या द्रावणाने स्वच्छ धुवून, त्यांची मलमपटटी करावी. गारपीटग्रस्त जनावरांना त्वरीत सकस व प्रोटीन आणि उर्जायूक्त आहार पुरवणे आवश्यक असते. पाण्यातून क्षार, गुळ, मिसळून द्यावा. तसेच ताण प्रतिरोधक औषधी  (जसे की स्ट्रेसनेल) आणि रोग प्रतिकार शक्ती वाढविणारी औषधी (इम्यूनोस्टीम्यूलंट्स) पाण्यामधून द्यावीत. नजीकच्या पशुवैद्यकाशी संपर्क साधून पुढील उपचार करावेत जसे की, प्रतिजैवकाची मात्रा व इतर.

सामुदायिक विज्ञान

कपडयावर ऑईलपेंट आणि नेलपेंटमुळे पडणारे डाग काढण्यासाठी घरगुती पध्दत. डाग पडलेल्या भागावर केरोसिन, खोबरेलतेल, गोडतेल किंवा पेट्रोल कापसाच्या किंवा स्पंजच्या साहाय्याने लावा. थोडा वेळ ठेवा आणि बोटाने बाहेरून आत चोळा. डाग पसरू द्यायचे नाही. डाग कोरडया कपडयाने पुसुन घ्यावे. कोमट साबणाच्या पाण्याने धुऊन प्रखर उन्हात डाग पडलेला भाग डाग नाहीसा होईपर्यंत ठेवा. तरीही डाग संपूर्णपणे न निघाल्यास लिंबाचा रस आणि मीठ चोळा. 3 ते 5 मिनिट तसेच ठेवा. साबनाच्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या आणि उन्हात ठेवा.

 चारा पिके

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व पावसासह  तुरळक ठिकाणी  गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, काढणी केलेल्‍या ज्‍वारीचा कडबा पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्‍यावी. कारण पावसात भिजल्‍यास त्‍याची प्रत खालावून साठवण क्षमता कमी होते व भिजलेला कडबा जनावरे खात नाहीत.

तुती रेशीम उद्योग

रेशीम कोषाचा एग्रेड उत्त्म प्रकारे मिळवण्यासाठी किटक संगोपन कौशल्य आत्मसात करणे आवश्य्‍क आहेखाद्य म्हणून तुती पानात पाण्याचे प्रमाण 80 टक्के मर्यादित ठेवणे आवश्यक आहेहलक्या जमिनीत ते दिवसाला तर भारी जमीनीत 10-12 दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळया द्याव्यातखत मात्रा; वर्षातून कंम्पोस्ट खत वेळा जुन व नोत्हेंबर महिण्यात टन प्रत्येकी (एकूण टन एकरीद्यावे म्हणजे वर्षाकाठी एकरी 25 टन पानाचे उत्पादन मिळतेदुसया वर्षापासून 250 अंडिपूजाची ते पीके घेणे शक्य होते. 200 किग्राकोषाच्या उत्पन्नास रू. 300/- प्रति किलो भाव ‍मिळला तरी 60,000/- प्रमाणे पिकाचे रू. 3 लक्ष उत्पन्न शेतकयाला मिळते.

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरेमुख्य प्रकल्प समन्वयकग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी