1.07 कोटी पेक्षा अधिक लाभार्थ्यांना कोविड 19 प्रतिबंधक लसीकरण
भारताचा सध्याचा सक्रीय रुग्णांचा दर आता भारताच्या एकूण बाधित रुग्णसंख्येपैकी 1.30 टक्के इतका आहे. भारताचा एकूण सक्रीय रुग्णसंख्या आज 1,43,127 इतकी असल्याचे समजते. काही राज्यांमध्ये दैनंदिन नवीन रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. केरळ, महाराष्ट्र, पंजाब, छत्तीसगड आणि पंजाब या राज्यांमध्ये दैनंदिन नवीन रुग्णसंख्येमध्ये वाढ दिसत आहे.
केरळमध्ये दैनंदिन नवीन रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून आले आहे.
गेल्या सात दिवसांमध्ये, छत्तीसगडमध्ये देखील दैनंदिन नवीन सक्रीय रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात, दैनंदिन नवीन रुग्णसंख्येची नोंद 259 इतकी झाली आहे.
मागील आठवड्यामध्ये, महाराष्ट्रात दैनंदिन नवीन रुग्णांमध्ये वाढ दिसून आली आहे, तसेच देशात आज सर्वाधिक रुग्णसंख्या देखील या राज्याची आहे. राज्यात गेल्या 24 तासात दैनंदिन नवीन रुग्णसंख्या 6,112 इतकी आहे.
महाराष्ट्राबरोबरच पंजाबमध्ये देखील अचानक दैनंदिन रुग्ण संख्येत गेल्या 7 दिवसात वाढ झाली असून गेल्या 24 तासात 383 इतकी दैनंदिन नवीन रुग्णांची संख्या आहे.
13 फेब्रुवारी 2021 पासून, मध्यप्रदेशमध्ये देखील दैनंदिन नवीन रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात गेल्या 24 तासात दैनंदिन नवीन संख्या 297 इतकी नोंदविली गेली आहे.
विषाणूच्या संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी आणि रोगाचा प्रसार नियंत्रणात ठेवण्यासाठी कोविड संदर्भातील नियमांचे पालन करण्याचे महत्व पुन्हा एकदा प्रभावीपणे सांगितले जात आहे.
जसे की, चांगल्या दर्जाच्या पायाभूत आरोग्य सुविधा आणि टेस्ट – ट्रॅक – ट्रीट पद्धत यामुळे 21 कोटीपेक्षा अधिक (21,02,61,480) चाचण्या देशभरात घेण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय बाधित रुग्णांच्या संचयी दरामध्ये गेल्या 13 दिवसांमध्ये सातत्याने घट दिसून आली आहे. सध्या तो 5.22 टक्के इतका आहे.
आज सकाळी आठ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार, एकूण 2,22,313 सत्रांमधून लसीकरणाच्या 1,07,15,204 मात्रा देण्यात आल्या आहेत. यामध्ये 63,28,479 आरोग्य कर्मचारी (पहिली मात्रा), 8,47,161 आरोग्य कर्मचारी (दुसरी मात्रा) आणि 35,39,564 अग्रभागी काम करणारे कर्मचारी (पहिली मात्रा) यांचा समावेश आहे.
ज्या लाभार्थ्यांनी लसीकरणाची पहिली मात्रा घेऊन 28 दिवस झाले आहेत, अशांसाठी कोविड 19 लसीकरणाची दुसरी मात्रा देण्यास 13 फेब्रुवारी 2021 रोजी प्रारंभ झाला. अग्रभागी राहून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 2 फेब्रुवारी 2021 पासून लसीकरणास प्रारंभ झाला आहे.
S.
No. |
State/UT |
Beneficiariesvaccinated | ||
1stDose | 2ndDose | TotalDoses | ||
1 | A&NIslands | 4,453 | 895 | 5,348 |
2 | AndhraPradesh | 3,98,108 | 71,707 | 4,69,815 |
3 | ArunachalPradesh | 19,608 | 3,951 | 23,559 |
4 | Assam | 1,47,368 | 10,164 | 1,57,532 |
5 | Bihar | 5,15,363 | 35,070 | 5,50,433 |
6 | Chandigarh | 12,100 | 547 | 12,647 |
7 | Chhattisgarh | 3,30,446 | 16,104 | 3,46,550 |
8 | Dadra&NagarHaveli | 4,801 | 169 | 4,970 |
9 | Daman&Diu | 1,672 | 153 | 1,825 |
10 | Delhi | 2,72,322 | 12,978 | 2,85,300 |
11 | Goa | 14,386 | 634 | 15,020 |
12 | Gujarat | 8,19,060 | 37,597 | 8,56,657 |
13 | Haryana | 2,05,616 | 21,093 | 2,26,709 |
14 | HimachalPradesh | 92,702 | 71,322 | 1,64,024 |
15 | Jammu&Kashmir | 1,89,840 | 5,282 | 1,95,122 |
16 | Jharkhand | 2,46,213 | 10,522 | 2,56,735 |
17 | Karnataka | 5,29,968 | 99,452 | 6,29,420 |
18 | Kerala | 3,92,993 | 32,060 | 4,25,053 |
19 | Ladakh | 5,005 | 358 | 5,363 |
20 | Lakshadweep | 1,809 | 115 | 1,924 |
21 | MadhyaPradesh | 6,26,391 | 0 | 6,26,391 |
22 | Maharashtra | 8,31,921 | 28,465 | 8,60,386 |
23 | Manipur | 38,585 | 1,434 | 40,019 |
24 | Meghalaya | 22,285 | 616 | 22,901 |
25 | Mizoram | 14,428 | 2,206 | 16,634 |
26 | Nagaland | 20,603 | 3,419 | 24,022 |
27 | Odisha | 4,33,584 | 68,129 | 5,01,713 |
28 | Puducherry | 8,481 | 645 | 9,126 |
29 | Punjab | 1,20,015 | 9,455 | 1,29,470 |
30 | Rajasthan | 7,80,665 | 19,054 | 7,99,719 |
31 | Sikkim | 11,102 | 698 | 11,800 |
32 | TamilNadu | 3,24,537 | 25,746 | 3,50,283 |
33 | Telangana | 2,80,277 | 86,051 | 3,66,328 |
34 | Tripura | 81,042 | 11,134 | 92,176 |
35 | UttarPradesh | 10,66,290 | 85,752 | 11,52,042 |
36 | Uttarakhand | 1,29,221 | 6,231 | 1,35,452 |
37 | WestBengal | 6,09,987 | 40,989 | 6,50,976 |
38 | Miscellaneous | 2,64,796 | 26,964 | 2,91,760 |
Total | 98,68,043 | 8,47,161 | 1,07,15,204 |
लसीकरण मोहिमेच्या (20 फेब्रुवारी 2021) 35 व्या दिवसापर्यंत 5,27,197 लसीकरणाच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. त्यापैकी 2,90,935 लाभार्थ्यांना 10,851 सत्रांमधून पहिली मात्रा देण्यात आली होती. त्यापैकी 2,90,935 लाभार्थ्यांना 10,851 सत्रांमधून पहिली मात्रा (आरोग्य कर्मचारी आणि अग्रभागी काम करणारे कर्मचारी) देण्यात आली आणि 2,36,262 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाची दुसरी मात्रा देण्यात आली.
9 राज्यांमध्ये लसीकरणाच्या प्रत्येकी 5 लाख मात्रा देण्यात आल्या आहेत. यामध्ये उत्तरप्रदेश (11,52,042), महाराष्ट्र (8,60,386), गुजरात (8,56,657), राजस्थान (7,99,719), पश्चिम बंगाल (6,50,976), कर्नाटक (6,29,420), मध्यप्रदेश (6,26,391), बिहार (5,50,433) आणि ओडिशा (5,01,713) यांचा समावेश आहे.
आतापर्यंत एकूण 1.06 कोटी (1,06,67,741) लोक बरे झाले आहेत. गेल्या 24 तासात 10,307 रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. भारतातील रुग्ण बरे होण्याचा दर 97.27 टक्के इतका दर हा जगातील अन्य उच्च दरांपैकी एक आहे.
नव्याने बरे झालेल्यांपैकी 80.51 टक्के रुग्णसंख्या ही 6 राज्यांमधील असल्याचे लक्षात आले आहे.
केरळमध्ये नव्याने बरे झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक म्हणजे 4,854 इतकी आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या 24 तासात 2,159 इतके रुग्ण बरे झाले आहेत, तर तामिळनाडूमध्ये त्यानंतर 467 इतकी संख्या आहे.
नवीन रुग्ण संख्येपैकी 86.69 टक्के रुग्णसंख्या ही 6 राज्यांमधील आहे.
महाराष्ट्रात सातत्याने नव्याने मोठ्यासंख्येने रुग्ण आढळले आहेत, ती संख्या आता 6,112 इतकी आहे. त्यानंतर केरळमध्ये 4,505 इतकी तर तामिळनाडूमध्ये 448 नवीन रुग्णांची नोंद आहे. केवळ महाराष्ट्र आणि केरळमध्ये 75.87 टक्के इतकी सक्रीय रुग्णांची संख्या आहे.
18 राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमधून गेल्या 24 तासात कोविड 19 च्या मृत्यूची एकही नोंद झालेली नाही. यामध्ये तेलंगणा, हरियाणा, जम्मू आणि काश्मिर (केंद्रशासित प्रदेश), झारखंड, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा, आसाम, छत्तीसगड, लक्षद्विप, मणिपूर, मेघालय, लडाख (केंद्रशासित प्रदेश), मिझोरम, सिक्कीम, नागालँड, अरूणाचल प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेटे, दादरा आणि नगरहवेली आणि दीव आणि दमण यांचा समावेश आहे.
गेल्या 24 तासात एकूण 101 मृत्यूंची नोंद झाली आहे.
नवीन मृत्यूपैकी 78.22 टक्के मृत्यू पाच राज्यांमधील आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक (44) इतकी नोंद आहे. केरळमध्ये 15 तर पंजाबमध्ये 8 मृत्यूंची नोंद झाली आहे.