8 राज्यांमध्ये प्रत्येकी 4 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लसीकरण

गेल्या 24 तासात 17 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोविड १९ चा एकही मृत्यू नाही

कोविड 19 विरोधात लढा देत असताना भारतामध्ये जवळपास 80 लाख लाभार्थ्यांचे  लसीकरण करण्यात आले आहे.

देशभरात सुरू असलेल्या कोविड 19 लसीकरण मोहिमेअंतर्गत 13 फेब्रुवारी 2021  रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत 79,67,647 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.

यापैकी 5,909,136  हे आरोग्य कर्मचारी आणि 2,05,511  हे आघाडीवरील  कर्मचारी आहेत. आतापर्यंत 1,64,781   लसीकरणाची सत्र झाली आहेत.

S. No. States/UTs Beneficiaries Vaccinated
1 A & N Islands 3,454
2 Andhra Pradesh 3,51,993
3 Arunachal Pradesh 15,098
4 Assam 1,25,038
5 Bihar 4,71,683
6 Chandigarh 8,017
7 Chhattisgarh 2,47,745
8 Dadra & Nagar Haveli 2,890
9 Daman & Diu 1,095
10 Delhi 1,77,439
11 Goa 12,949
12 Gujarat 6,67,073
13 Haryana 1,94,124
14 Himachal Pradesh 79,166
15 Jammu & Kashmir 1,11,470
16 Jharkhand 1,88,095
17 Karnataka 4,91,552
18 Kerala 3,45,197
19 Ladakh 2,854
20 Lakshadweep 1,776
21 Madhya Pradesh 5,26,095
22 Maharashtra 6,49,660
23 Manipur 19,563
24 Meghalaya 12,797
25 Mizoram 11,332
26 Nagaland 9,125
27 Odisha 3,99,670
28 Puducherry 5,510
29 Punjab 1,01,861
30 Rajasthan 6,06,694
31 Sikkim 8,335
32 Tamil Nadu 2,27,542
33 Telangana 2,78,250
34 Tripura 65,288
35 Uttar Pradesh 8,58,602
36 Uttarakhand 1,04,052
37 West Bengal 4,85,054
38 Miscellaneous 99,509
Total 79,67,647

लसीकरण मोहिमेमध्ये 12 फेब्रुवारी 2021 रोजी 4,62,636  इतक्या लाभार्थ्यांना (आरोग्य कर्मचारी – 94,160) आणि (आघाडीवरील  कर्मचारी – 3,68,477) 10,411 सत्रांमधून लसीकरण देण्यात आले.

लसीकरणाच्या लाभार्थ्यांचा दैनंदिन आकडाच लसीकरणातील सातत्यपूर्ण वाढ दर्शवित आहे.

भारतातील एकूण लसीकरणापैकी 60 टक्के (59.70 टक्के)  संख्या ही  8 राज्यांमधून आहे. या 8 राज्यांमध्ये प्रत्येकी 4,00,000 पेक्षा अधिक लाभार्थ्यांचे  लसीकरण करण्यात आले आहे. भारतातील एकूण लाभार्थ्यांच्या आकडेवारीपैकी एकट्या उत्तर प्रदेशातील  10.08 टक्के (8,58,602  लाभार्थी) लाभार्थी आहेत.

गेल्या 24 तासात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये दैनंदिन मृत्यूचे प्रमाण देखील लक्षणीय घट दर्शवित आहे. ज्यामध्ये 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये  कोणत्याही नवीन कोविड 19 मृत्यूची नोंद झालेली नाही. तर 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 1 ते 5 इतकी नव्या मृत्यूंची नोंद आहे.

गेल्या 24 तासात 17 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोविड 19 च्या एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. यामध्ये तेलंगणा, ओडिशा, झारखंड, पुद्दुचेरी, चंदीगड, नागालँड, आसाम, मणिपूर, सिक्कीम, मेघालय, लडाख (केंद्रशासित प्रदेश), मिझोरम, अंदमान आणि निकोबार बेटे, त्रिपुरा, लक्षद्विप, अरुणाचलप्रदेश, आणि दादरा आणि नगर हवेली आणि दीव आणि दमण यांचा समावेश आहे.

आज भारतातील सध्या सक्रीय रुग्णांची संख्या 1.36 लाख (1,36,571) इतकी आहे. भारतातील एकूण बाधित रुग्णसंख्येपैकी सक्रीय रुग्णसंख्या ही केवळ 1.25 टक्के  इतकीच आहे.

यापूर्वी एकूण 1.06 कोटी लोक (1,06,00,625) बरे झाले आहेत. गेल्या 24 तासात 11,395 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 97.32 टक्के इतका आहे.

एकूण बरे झालेल्या रुग्णांपैकी 81.93 टक्के रुग्ण हे 6 राज्यांमधील आहेत, असे लक्षात आले आहे.

केरळमध्ये एका दिवसात सर्वाधिक रुग्ण बरे झाल्याची, म्हणजेच नव्याने 5,332 रुग्ण बरे झाल्याची नोंद आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात  2,422  रुग्ण बरे झाले आहेत. तर तामिळनाडूमध्ये बरे झालेल्यांची सख्या 486 इतकी आहे.

गेल्या 24 तासात 12,143 इतकी दैनंदिन रुग्णांची नोंद आहे.

एकूण नव्या रुग्णांपैकी 86.01 टक्के रुग्ण 6 राज्यांमधील आहेत.

केरळमध्ये पुन्हा एकदा सातत्याने 5,397 इतकी सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यानंतर महाराष्ट्रात 3,670 तर तामिळनाडू मध्ये 483 नवीन रुग्ण आढळले आहेत.

गेल्या 24  तासात 103 मृत्यूंची नोंद झाली आहे.

एकूण मृत्यूंपैकी  80.58 टक्के मृत्यू सहा राज्यांमधील आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक (36) मृत्यू नोंदविले गेले. त्यापाठोपाठ केरळमध्ये दैनंदिन मृत्यूची नोंद 18 तर कर्नाटक आणि पंजाबमध्ये प्रत्येकी 8 मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.