भारतातील दहा लाख लोकसंख्येमागे एकूण रुग्णसंख्या आणि मृत्यूचे प्रमाण जगातील सर्वात कमी प्रमाणापैकी एक
भारताच्या एकूण उपचाराधीन रुग्णसंख्येत सातत्यपूर्ण घसरण सुरूच आहे.
आज उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या 1.51 लाख (1,51,460) पर्यंत खाली घसरली. आतापर्यन्त झालेल्या मृत्यूंपेक्षा (1,54,823) ही संख्या कमी आहे. उपचाराधीन रुग्णसंख्या भारताच्या एकूण बाधित संख्येच्या केवळ 1.40 टक्के आहे.
भारताच्या दैनंदिन नवीन रुग्णसंख्येतही घसरण सुरूच आहे. गेल्या 24 तासांत 12,408 नवीन रुग्णांची नोंद झाली.
भारताची प्रति दहा लाख लोकसंख्येपैकी बाधित रुग्णांची संख्या (7,828) जगातील सर्वात कमी संख्येपैकी एक आहे. रशिया, जर्मनी, इटली, ब्राझील, फ्रान्स, ब्रिटेन आणि अमेरिकेसारख्या देशांमध्ये हा दर खूप जास्त आहे.
17 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रति दहा लाख लोकसंख्येत बाधित रुग्णांची संख्या राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये केवळ लक्षद्वीपमध्ये प्रति दहा लाख बाधित रुग्णसंख्येची सरासरी सर्वात कमी 1,722 इतकी आहे.
5 फेब्रुवारी, 2021 रोजी सकाळी 8:00 वाजेपर्यंत, जवळपास 50 लाख (49,59,445) लाभार्थ्यांना देशव्यापी कोविड-19 लसीकरण अंतर्गत लस देण्यात आली आहे.
गेल्या 24 तासांत 11,184 सत्रामध्ये 5,09,893 लोकांना लस देण्यात आली. आतापर्यंत 95,801 सत्रे घेण्यात आली आहेत.
S. No. | States/UTs | Beneficiaries Vaccinated |
1 | A & N Islands | 2,938 |
2 | Andhra Pradesh | 2,43,243 |
3 | Arunachal Pradesh | 10,889 |
4 | Assam | 60,556 |
5 | Bihar | 3,12,339 |
6 | Chandigarh | 4,782 |
7 | Chhattisgarh | 1,31,173 |
8 | Dadra & Nagar Haveli | 1,075 |
9 | Daman & Diu | 561 |
10 | Delhi | 90,927 |
11 | Goa | 7,193 |
12 | Gujarat | 3,48,183 |
13 | Haryana | 1,33,637 |
14 | Himachal Pradesh | 48,360 |
15 | Jammu & Kashmir | 34,475 |
16 | Jharkhand | 75,205 |
17 | Karnataka | 3,30,112 |
18 | Kerala | 2,70,992 |
19 | Ladakh | 1,511 |
20 | Lakshadweep | 807 |
21 | Madhya Pradesh | 3,39,386 |
22 | Maharashtra | 3,89,577 |
23 | Manipur | 6,095 |
24 | Meghalaya | 5,469 |
25 | Mizoram | 10,044 |
26 | Nagaland | 4,405 |
27 | Odisha | 2,34,923 |
28 | Puducherry | 3,222 |
29 | Punjab | 67,861 |
30 | Rajasthan | 3,84,810 |
31 | Sikkim | 4,264 |
32 | Tamil Nadu | 1,45,928 |
33 | Telangana | 1,88,279 |
34 | Tripura | 35,191 |
35 | Uttar Pradesh | 5,89,101 |
36 | Uttarakhand | 62,858 |
37 | West Bengal | 3,20,668 |
38 | Miscellaneous | 58,406 |
Total | 49,59,445 |
लसीकरण केलेल्या लाभार्थ्यांपैकी 61 टक्के लाभार्थी 8 राज्ये / केंद्रशासित प्रदेशातील आहेत. भारतात लसीकरण झालेल्या एकूण लाभार्थ्यांपैकी 11.9 टक्के (5,89,101) उत्तर प्रदेशातले आहेत.
आतापर्यंत एकूण 1.04 कोटी (1,04,96,308) रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 15,853 रूग्ण बरे झाले आहेत आणि त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.16 टक्क्यांवर पोहोचला आहे. मोठ्या प्रमाणात बरे होणाऱ्या रुग्णसंख्येमुळे बरे झालेले रुग्ण आणि उपचाराधीन रुग्ण यातील अंतर 1,03,44,848 पर्यंत वाढले आहे.
काल बरे झालेल्या रुग्णांपैकी 85.06 टक्के रुग्ण 6 राज्ये / केंद्रशासित प्रदेशात आहेत.
केरळमध्ये काल एका दिवसात 6,341 इतके सर्वाधिक रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 5,339 रुग्ण बरे झाले आणि त्याखालोखाल तामिळनाडूमध्ये 517 रुग्ण बरे झाले.
गेल्या 24 तासांत 12,408 नव्या रुग्णांची नोंद झाली.
नवीन रुग्णांपैकी 84.25 टक्के रुग्ण 6 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत.
केरळमध्ये काल सर्वाधिक 6,102.नवीन रुग्णांची नोंद झाली. त्याखालोखाल महाराष्ट्रात 2,736 आणि तामिळनाडूमध्ये 494 नवीन रुग्ण आढळले आहेत.
गेल्या 24 तासांत 120 मृत्यूची नोंद झाली.
नवीन मृत्यूंपैकी 74.17% मृत्यू सहा राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 46 मृत्यू झाले असून केरळमध्ये 17 तर पंजाब आणि दिल्ली येथे प्रत्येकी 7 मृत्यूची नोंद झाली आहे.
गेल्या चोवीस तासांत चौदा राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. आंध्र प्रदेश, झारखंड, पुदुचेरी, मणिपूर, मेघालय, सिक्किम, नागालँड, मिझोरम, लडाख , त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेटे, दमण आणि दीव आणि दादरा आणि नगर हवेली आणि लक्षद्वीप यांचा यात समावेश आहे.
भारतात प्रति दहा लाख लोकसंख्येमागे 112 मृत्यू हे जगातील सर्वात कमी मृत्यूंपैकी एक आहे.
सकारात्मक बाजूने विचार करता, 19 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रति दहा लाख मृत्यूचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. लक्षद्वीप यात आघाडीवर असून त्याचा प्रति दहा लाख मृत्यूचे प्रमाण 0 आहे.
17 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रति दहा लाख लोकसंख्येमागे मृत्यूचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे. दिल्लीचा प्रति दहा लाख 581 मृत्यूंचा आकडा सर्व राज्यांमध्ये अधिक आहे.