भारताचा रुग्ण बरे होण्याचा दर 97 टक्क्यांवर

37.5 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना कोविड-19 प्रतिबंधक लस देण्यात आली

बरे झालेल्या रुग्णांच्या एकूण संख्येत सातत्याने वाढ होत असल्यामुळे  भारताचा रुग्ण बरे  होण्याचा दर  97% वर पोहोचला आहे, जो जागतिक पातळीवरील सर्वोच्च दरांपैकी एक आहे.  भारताची एकूण सक्रिय रुग्णसंख्या आज 1.68 लाख (1,68,235) पर्यंत घसरली आहे. सक्रिय रुग्णांचे प्रमाण आता भारताच्या एकूण बाधित रुग्णांच्या केवळ 1.56 टक्के आहे.

आतापर्यंत एकूण 1,04,34,983 लोक बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 11,858 रूग्ण बरे झाले आहेत आणि त्यांना घरी सोडण्यात आले. बरे झालेले रुग्ण आणि नवे रुग्ण यातील अंतर  1 कोटीपेक्षा अधिक (10,266,748) इतके वाढले आहे.

भारतातील रोज आढळणाऱ्या नवीन रुग्णांच्या संख्येत घसरण सुरूच आहे.11 सप्टेंबर , 2021 रोजी 96 551 इतके सर्वाधिक रुग्ण आढळले होते तर आज  1 फेब्रुवारी, 2021 रोजी नवीन रुग्णांची दैनंदिन संख्या  11,427 पर्यंत खाली आली आहे.

देशात मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची दैनंदिन संख्या  120 च्या खाली आली आहे.  गेल्या 24 तासांत 118 मृत्यूची  नोंद झाली आहे.

1 फेब्रुवारी, 2021 रोजी सकाळी 8:00 वाजेपर्यंत 37.5 लाख (37,58,843) पेक्षा जास्त लाभार्थ्यांना देशभरात कोविड  19 लसीकरणाच्या अंतर्गत लस देण्यात आली आहे.

गेल्या 24 तासांत 253 सत्रामध्ये 14,509 लोकांना लस देण्यात आली. आतापर्यंत 69,215 सत्रे घेण्यात आली आहेत.

 

S. No. States/UTs Beneficiaries Vaccinated
1 A & N Islands 2,727
2 Andhra Pradesh 1,87,252
3 Arunachal Pradesh 9,651
4 Assam 38,106
5 Bihar 1,48,293
6 Chandigarh 3,447
7 Chhattisgarh 72,704
8 Dadra & Nagar Haveli 692
9 Daman & Diu 391
10 Delhi 56,818
11 Goa 4,117
12 Gujarat 2,47,891
13 Haryana 1,25,977
14 Himachal Pradesh 27,734
15 Jammu & Kashmir 26,634
16 Jharkhand 40,860
17 Karnataka 3,15,370
18 Kerala 1,65,171
19 Ladakh 1,128
20 Lakshadweep 807
21 Madhya Pradesh 2,98,376
22 Maharashtra 2,69,064
23 Manipur 3,987
24 Meghalaya 4,324
25 Mizoram 9,346
26 Nagaland 3,993
27 Odisha 2,06,424
28 Puducherry 2,736
29 Punjab 57,499
30 Rajasthan 3,30,797
31 Sikkim 2,020
32 Tamil Nadu 1,05,821
33 Telangana 1,68,606
34 Tripura 29,796
35 Uttar Pradesh 4,63,793
36 Uttarakhand 31,228
37 West Bengal 2,43,143
38 Miscellaneous 52,120
Total 37,58,843

बरे झालेल्या नवीन रुग्णांपैकी  86.47% रुग्ण  10 राज्ये / केंद्रशासित प्रदेशात आहेत.

केरळमध्ये काल एका दिवसात 5,730 इतक्या सर्वाधिक संख्येने रुग्ण बरे झाले. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 1,670 रुग्ण बरे झाले आणि त्याखालोखाल तामिळनाडूमध्ये 523 रुग्ण बरे झाले.

गेल्या 24 तासांत दररोज 11,427 नवीन रुग्ण आढळले.

नवीन रुग्णांपैकी 80.48% रुग्ण 5 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत.

केरळमध्ये काल सर्वाधिक 5,266 इतक्या नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्याखालोखाल  महाराष्ट्रात 2,585 आणि कर्नाटकात 522 नवीन रुग्ण आढळले आहेत.  नवीन दैनंदिन रुग्णांपैकी केरळ आणि महाराष्ट्र या दोन प्रमुख राज्यांमध्ये 68.71 टक्के नवे रुग्ण आढळले आहेत.

नवीन मृत्यूंमध्ये सहा राज्ये / केंद्रशासित प्रदेशांचा वाटा 76.27% आहे. महाराष्ट्रात काल सर्वाधिक  (40) मृत्यू झाले तर केरळमध्ये 21 आणि पश्चिम बंगालमध्ये 9 मृत्यू झाले.