देशात एकूण 6,74,835 लाभार्थ्यांचे कोरोना लसीकरण

कोविड-19 प्रतिबंधातील मार्गक्रमणात भारताची महत्त्वपूर्ण कामगिरी – 6 महिने आणि 24 दिवसानंतर सक्रिय रुग्णांची संख्या 2 लाखांहून कमी

भारताने आज महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. एकूण सक्रिय रुग्णांची संख्या आज 2 लाखांहून कमी म्हणजे 1,97,201 इतकी झाली आहे. ही संख्या एकूण रुग्णांच्या केवळ 1.86% आहे. 207 दिवसांनंतर हे प्रमाण सर्वात कमी आहे. 27 जून 2020 रोजी एकूण सक्रिय रुग्ण संख्या 1,97,387 होती.

गेल्या 24 तासांत 16,988 रुग्ण बरे होऊन घरी परतले. यामुळे एकूण सक्रिय प्रकरणांत 3327 ची घट झाली आहे.

या सक्रिय रुग्णांपैकी 72%  हे फक्त 5 राज्यांमधील आहेत.

34 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात 10,000 पेक्षा कमी सक्रिय प्रकरणे आहेत.

भारतातील दैनंदिन नवीन रुग्णांमध्ये सतत घट होत असल्याने सक्रिय रुग्णसंख्याही कमी होत आहे.

जागतिक पातळीवर, गेल्या 7 दिवसांत दर दशलक्ष लोकसंख्येमागे दैनंदिन आढळणाऱ्या नवीन कोविड-19 रुग्णांची सर्वात कमी नोंद असणाऱ्या देशांपैकी भारत एक देश आहे.

20 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7 पर्यंत एकूण 6,74,835 लाभार्थ्यांचे लसीकरण झाले आहे. गेल्या 24 तासांत 3,860 सत्रांमध्ये 2,20,786 लोकांचे लसीकरण करण्यात आले. आत्तापर्यंत 11,720 सत्रे घेण्यात आली आहेत.

 

S. No. State/UT Beneficiaries vaccinated
1 A & N Islands 644
2 Andhra Pradesh 65,597
3 Arunachal Pradesh 2,805
4 Assam 7,585
5 Bihar 47,395
6 Chandigarh 469
7 Chhattisgarh 10,872
8 Dadra & Nagar Haveli 125
9 Daman & Diu 94
10 Delhi 12,902
11 Goa 426
12 Gujarat 21,832
13 Haryana 28,771
14 Himachal Pradesh 5,049
15 Jammu & Kashmir 4,414
16 Jharkhand 8,808
17 Karnataka 82,975
18 Kerala 24,007
19 Ladakh 119
20 Lakshadweep 369
21 Madhya Pradesh 18,174
22 Maharashtra 33,484
23 Manipur 1111
24 Meghalaya 1037
25 Mizoram 1091
26 Nagaland 2,360
27 Odisha 60,797
28 Puducherry 759
29 Punjab 5,567
30 Rajasthan 32,379
31 Sikkim 358
32 Tamil Nadu 25,908
33 Telangana 69,405
34 Tripura 3,734
35 Uttar Pradesh 22,644
36 Uttarakhand 6,119
37 West Bengal 43,559
38 Miscellaneous 21,091
  Total 6,74,835

 

एकूण बरे झालेल्यांची संख्या 1.02 कोटी (10,245,741) आहे.

काही दिवसांपूर्वी एकूण बरे झालेल्यांची संख्या सक्रिय रुग्णांपेक्षा एक कोटींनी जास्त होती. ही तफावत आज 10,048,540 वर आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाण आज 96.70% पर्यंत सुधारले आहे. नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण जास्त असल्याने हा फरक सातत्याने वाढत आहे.

नव्याने बरे होणाऱ्यांचे प्रमाण 80.43% असून ते 10 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशात आढळले आहेत.

नव्याने बरे झालेल्या 4,516 रुग्णांमुळे दैनंदिन बरे होणाऱ्यांचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक असून त्याखालोखाल केरळमध्ये 4,296 तर  कर्नाटकमध्ये 807 रुग्ण बरे झाले आहेत.

नवीन प्रकरणांपैकी 79.2%  हे सात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकवटलेले आहेत.

केरळमध्ये दररोजच्या सर्वाधिक नवीन रुग्णांची नोंद 6,186 झाली आहे. त्याखालोखाल महाराष्ट्रात 2,294 नवीन प्रकरणे आहेत.

दैनंदिन मृत्यूच्या संख्येतही सतत घट होत असून ही संख्या आज 162 आहे.

नवीन मृत्यूंमध्ये सहा राज्ये / केंद्रशासित प्रदेशांचा वाटा 71.6% आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक दैनंदिन मृत्यूची (50) नोंद असून त्याखालोखाल केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये अनुक्रमे 26 आणि 11 दैनंदिन मृत्यू होतात.