जगभरामध्ये भारतात सर्वाधिक – 99 लाखांपेक्षा जास्त रूग्ण बरे झाल्याची नोंद
भारतामध्ये दररोज जितक्या लोकांना कोरोनाची बाधा होते, त्याच्यापेक्षा जास्त संख्येने कोरोनाचे रूग्ण बरे होत आहेत. हा कल सातत्याने कायम आहे. भारतामध्ये सक्रिय कोरोनारूग्णांची संख्या आता 2.50 लाखांपर्यंत खाली आली आहे. आज देशात 2,50,183 कोरोनाचे रूग्ण आहेत.
भारतामध्ये कोरोनाच्या सक्रिय रूग्ण रूग्णांचे प्रमाण 2.5 टक्क्यांपेक्षा कमी म्हणजे 2.43 टक्के आहे.
गेल्या चोवीस तासांमध्ये भारतामध्ये 19,079 जणांना कोविड झाल्याचे निष्पन्न झाले. तर या आजारातून 22,926 बरे झाले आहेत. कोविड सक्रिय रूग्णसंख्येत 4,071 ने घट झाली आहे.
केरळ, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगड या पाच राज्यांमध्ये मिळून सक्रिय कोरोना रूग्णांचे प्रमाण देशातील रुग्णसंख्येच्या 62 टक्के आहे.
गेल्या सात दिवसांमध्ये प्रतिदशलक्ष लोकसंख्येमागे भारतात सर्वात कमी कोरोना बाधितांची संख्या (101) नोंदली गेली आहे. गेल्या सात दिवसांत ब्राझिल, रशिया, फ्रान्स, इटली, अमेरिका आणि यू. के. या देशांमध्ये प्रतिदशलक्ष लोकसंख्येमागे कोरोना बाधितांची संख्या जास्त आहे.
भारतात कोरोना आजारातून बरे झालेल्यांची संख्या आता 99 लाखांच्याही (99,06,387) पुढे गेली असून ती आता एक कोटीपर्यंत पोहोचेल.
कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण आज 96.12 टक्क्यांपर्यंत सुधारले आहे. कोरोना रूग्णबाधित होण्याचे आणि हा आजार बरा होणा-यांच्या प्रमाणातील अंतर सातत्याने वाढत आहे. सध्या हे अंतर 96,56,204 आहे.
दहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये बरे झालेल्या रूग्णांचे प्रमाण 78.64 टक्के आहे.
कोविड आजारातून केरळमधले 5,111 लोक बरे झाले तर महाराष्ट्रातले 4,279 रूग्ण या आजारातून बरे झाले आहेत. पश्चिम बंगालमधून 1,496 रूग्ण बरे झाल्याची नोंद आहे.
दहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात कोरोनाची नव्याने बाधा झालेल्यांची संख्या देशातील एकूण संख्येच्या 80.56 टक्के आहे.
गेल्या चोवीस तासांत केरळमध्ये 4,991 जणांना कोरोनाची बाधा झाली. तर महाराष्ट्रातल्या 3,524 जणांना कोरोना झाला. तर पश्चिम बंगालमध्ये 1,153 नवीन रूग्ण नोंदवले गेले आहेत.
गेल्या 24 तासांमध्ये कोरोना आजारामुळे 224 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 75.45 टक्के दहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधले रूग्ण आहेत.
महाराष्ट्रात कोरोनामुळे 59 जणांचे निधन झाले. हे प्रमाण देशातील कालच्या मृत्यू संख्येच्या 26.33 टक्के आहे. पश्चिम बंगालमधल्या 26 जणांचा तर केरळमधल्या 23 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला.