आयुष मंत्रालयाच्यावतीने औषधी वनस्पती यांची पुरवठा साखळी आणि मूल्य शृंखला यांच्या भागधारकांमध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी तसेच संपर्क व्यवस्था तयार करण्यासाठी ‘एनएमपीबी’ म्हणजेच राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाने कार्य सुरू केले आहे.
मंडळाच्यावतीने स्थापण्यात आलेल्या औषधी वनस्पती संघाच्यावतीने दर्जेदार रोपे, बियाणे आदि साहित्य, संशोधन आणि विकास, लागवड, औषधी वनस्पतींचा व्यापार आणि विपणन साखळी तयार करणे याविषयी कार्य करण्यात येणार आहे.
औषधी वनस्पतींचे उत्पादन घेणारे शेतकरी आणि वनस्पतींचा वापर करून तयार करणारे औषधांचे उत्पादक यांच्यामध्ये संबंध स्थापित करण्यासाठी ‘सीड टू शेल्फ’ ही पद्धत सुरू करण्यात येत आहे. यामध्ये क्यूपीएम म्हणजे दर्जेदार पद्धतीने वनस्पतींची लागवड करणे, जीएपीज् म्हणजे चांगली कृषी पद्धत स्वीकारणे, जीपीएचपीज् म्हणजे उत्पादनानंतर चांगल्या पद्धतीने मालाचा वापर करणे याविषयी विचार करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय औषधी वनस्पती संघाच्यावतीने पहिल्या टप्प्यात विचार करण्यात येणा-या औषधी प्रजातींमध्ये अश्वगंधा, पिप्पली, आवळा, गुग्गुळ, शतावरी यांचा समावेश आहे.
राष्ट्रीय औषधी वनस्पती संघामध्ये सहभागी होण्यासाठी एनएमपीबीच्या संकेतस्थळावर दुवा उपलब्ध आहे. या संकेतस्थळावर पात्र संस्था, शेतकरी, एफपीओ, एफपीसी, क्यूपीएम केंद्रे, बियाणे बँका, रोपवाटिका, स्वमदत समूह, स्वयंसेवी संस्था, व्यापारी, उत्पादक, निर्यातक, औषध कंपन्या, संशोधन संस्था, कृषी विद्यापीठे आपली नोंदणी करू शकणार आहेत.