भारताने महत्त्वपूर्ण कामगिरी नोंदवली : 146 दिवसानंतर उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या 3.63 लाखांपर्यंत खाली आली
भारतात उपचार सुरु असलेल्या रुग्णांच्या एकूण संख्येत आज लक्षणीय घट होऊन ती 3.63 लाख (3,63,749) झाली आहे. 146 दिवसांनंतरची ही सर्वात कमी संख्या आहे. 18 जुलै 2020 रोजी एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 3,58,692 होती.
देशात उपचार सुरु असलेल्या रुग्णांच्या एकूण संख्येत घट होण्याचे प्रमाण कायम आहे. भारताच्या सध्या उपचार सुरु असलेल्या रुग्णांचे प्रमाण एकूण बाधित संख्येच्या केवळ 3.71% आहे.
गेल्या 24 तासांत 37,528 रुग्ण बरे झाले आणि त्यांना घरी सोडण्यात आले. यामुळे एकूण सक्रिय रुग्णांच्या संख्येत 8,544 ची घट झाली आहे.
गेल्या 24 तासात देशात 30,000 पेक्षा कमी म्हणजेच 29,398 नवीन रुग्ण आढळले.
बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या जवळपास 93 लाख (92,90,834) वर गेली आहे. बरे झालेले रुग्ण आणि उपचार सुरु असलेले रुग्ण यांच्यातील तफावत निरंतर वाढत आहे आणि आज ती 89 लाखाच्या पुढे म्हणजेच 89,27,085 इतकी झाली आहे.
नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक असल्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर सुधारून 94.84% वर गेला आहे.
बरे झालेल्या रुग्णांपैकी 79.90 % रुग्ण हे 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील आहेत
कर्नाटकमध्ये काल सर्वाधिक 5,076 रुग्ण बरे झाले . त्याखालोखाल महाराष्ट्रात 5,068 तर केरळमध्ये 4,847 रुग्ण बरे झाले.
खालील आकृतीत मागील एका आठवड्यातील सरासरी बरे झालेल्या रुग्णांची संख्या दाखवली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 6,703 इतके सरासरी रुग्ण बरे झाले, त्याखालोखाल केरळमध्ये 5,173 आणि दिल्लीत 4,362 रुग्ण बरे झाले.
नवीन रुग्णांपैकी 72.39% रुग्ण 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत.
केरळमध्ये काल सर्वाधिक 4,470 नवे रुग्ण आढळले. त्या खालोखाल महाराष्ट्रात काल 3,824 नवे रुग्ण आढळले.
गेल्या 24 तासात 414 मृत्यूंची नोंद झाली.
यापैकी 79.95% मृत्यू 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत.
नवीन मृत्यूपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक(70) मृत्यू झाले असून दिल्लीत 61 तर पश्चिम बंगालमध्ये 49 जणांचा मृत्यू झाला.