मराठवाड्यात पुढील पाच दिवसात आकाश स्वच्छ ते ढगाळ राहण्याची शक्यता
मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राकडून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील पाच दिवसात आकाश स्वच्छ ते ढगाळ राहून किमान तापमान १०.० ते १८.० सें. दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारस केली आहे.
पीक व्यवस्थापन
हरभरा पीक फांंद्या लागणे अवस्थेत असून हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी २ कामगंध सापळे व २० पक्षी थांबे लावावेत. हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी ५ % (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस २५ % इसी २० मीली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ % ४.५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिक पेरणी करून ४५ दिवस झाले असल्यास जमिनीच्या प्रकारानुसार पाणी व्यवस्थापन करावे.
करडई पीक वाढीच्या अवस्थेत असून करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमेथोट ३० % १३ मीली किंवा असिफेट ७५ % १० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पीकात हलकी कोळपणी करून घ्यावी.
लागवड केलेल्या ऊस पिकात आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. ऊस काढणी नंतर ऊस पिकाचे पाचट जाळू नये.
हळद पीक कंद वाढीच्या अवस्थेत असून हळद पिकात पानावरील ठिपके या रोगाच्या व्यवस्थापनासाठी अॅझोक्सिस्ट्रोबीन १८.२ % अधिक डायफेनकोनॅझोल ११.४ % एससी १० मीली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हळद पिकात कंद माशीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी क्विनॉलफॉस २५ % २० मीली किंवा डायमेथोएट ३० % १० मीली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारणी करावी व मातीने कंद झाकून घ्यावे. (हळद पिकावर केंद्रीय कीटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामुळे विद्यापीठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत).
फळबागेचे व्यवस्थापन
संत्रा/मोसंबी पीक फळ वाढीच्या अवस्थेत असून संत्रा/मोसंबी बागेत फळशोषण करणाऱ्या पतंग चा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी बागेत प्रकाश सापळे लावावे. मृग बहार संत्रा/मोसंबी बागेला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी.
डाळिंब पीक काढणी अवस्थेत असून काढणीस तयार असलेल्या डाळिंबची काढणी करून घ्यावी.
चिकू पीक वाढीच्या अवस्थेत असून चिकू बागेत आवश्यकतेनुसार व्यवस्थापन करावे.
फुलशेती व्यवस्थापन – फुल शेती वाढीच्या अवस्थेत असून फुल बागेत पाणी व्यवस्थापन करावे.
भाजीपाला पिके – भाजीपाला पीक वाढीच्या अवस्थेत असून रब्बी हंगामात लागवड केलेल्या भाजीपाला पिकात पाणी व्यवस्थापन करावे.
वांगे भाजीपाला पीकात शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी २ कामगंध सापळे लावावे किंवा क्लोरंट्रानिलीप्रोल १८.५ % एससी ४ मीली किंवा क्लोरपायरीफॉस २० % एससी २० मीली किंवा सायपरमेथ्रीन १० % ईसी ११ मीली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
चारा पिके – चारा पीकाला पेरणी करून १ महिना झाला असल्यास ५० किलो प्रती हेक्टर नत्र खताची मात्रा द्यावी.
पशुधन – दिवसेंंदिवस किमान तापमानात होत असलेल्या घटीमुळे पशुधनाचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी शेळ्या,मेंढ्या तसेच कोंबड्याच्या शेडला बारदाण्याचे पडदे लावावे, त्यामुळे पहाटेच्या थंड वाऱ्यापासून त्यांचे संरक्षण होईल.
सौजन्य
डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
कृषी हवामान सल्ला पत्रक क्रमांक – ७२/२०२०-२१ दिनांक – ०८.१२.२०२०