मराठवाडयाकरिता हवामान अंदाज व कृषि सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ ते ढगाळ राहून किमान तापमान ११.० ते १७.० सें दरम्यान राहील.
पिक व्यवस्थापन
कापूस वेचणी अवस्थेत कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड (खोडवा) घेऊ नये. कापूस पिकाची शेवटची वेचणी पूर्ण झाल्यावर कापूस पिकाचा पालापाचोळा, पराटया जमा करून त्यांची योग्य ते विल्हेवाट लावावी. तूर पीक शेंगा भरणेच्या अवस्थेत असून तूर पीकात अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क़्विनॉलफॉस २५ % २० मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ % ४.४ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
उशीरा पेरणी केलेल्या तूर पीकाला पाण्याच्या उपलब्धतेनुसार व पिकाच्या आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
रब्बी ज्वारी पीक वाढीच्या अवस्थेत असून उगवण झालेल्या रब्बी ज्वारी पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामीथोक्झाम १२.६ % + ल्यामडा सायहालोथ्रीन ९.५ झेडसी ५ मिली किंवा स्पिनेटोरम ११.७ एससी ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रब्बी ज्वारी पीकाला पाण्याच्या उपलब्धतेनुसार व पिकाच्या आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
गहू पेरणी अवस्थेत असून उशीरा बागायती गहू पिकांची पेरणी १५ डिसेंबर पर्यंत करता येते. उशीरा बागायती गहू पिकांच्या पेरणीसाठी निफाड-३४, एचडी-२५०१, एचडी-२८३३ किंवा समाधान या वाणाची निवड करावी. उशीरा बागायती गहू पिकांच्या पेरणीसाठी ८०:४०:४० किलो नत्र, स्फुरद व पालाश खताची शिफारस आहे त्यापैकी पेरणी वेळी अर्धे नत्र व पूर्ण स्फुरद व पालाश खत मात्रा द्यावी. वेळेवर पेरणी केलेल्या गहू पीकाला पाण्याच्या उपलब्धतेनुसार व पिकाच्या आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
फळबागेचे व्यवस्थापन
केळी बाग घड बाहेर पडणे अवस्थेत असून केळी बागेत सिगाटोगा रोगाच्या व्यवस्थापनासाठी प्रोपीकोनाझोल १० मिली + स्टिकर प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. केळी बाग घड बाहेर पडणे अवस्थेत असताना झाडांना काठीचा आधार द्यावा. केळी बागेला ५० ग्राम प्रती झाड म्युरेट ऑफ पोटॅश खताची मात्रा द्यावी. आंबा बाग फुल धरणे अवस्थेत असून आंबा बागेला चांगली फुल धारणा होण्यासाठी सध्या पाणी देऊ नये. आंबा बागेत तण नियंत्रण करावे. द्राक्षे बाग फुले लागणे अवस्थेत असून आवश्यकतेनुसार द्राक्षे बागेत पाणी व्यवस्थापन करावे. सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळे द्राक्षे बागेत रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्यांचे व्यवस्थापन करावे.
फुलशेती व्यवस्थापन
फुल शेती वाढीच्या अवस्थेत असून पुनर्लागवड केलेल्या फुल पिकात तण व्यवस्थापन करून पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस आलेल्या फुलांची आवश्यकतेनुसार काढणी करून घ्यावे.
भाजीपाला पिके
भाजीपाला पीक वाढीच्या अवस्थेत असून टोमटो भाजीपाला पीकात करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी अॅझोक्सिस्ट्रोबीन १८.२ % + डायफेनकोनॅझोल ११.४ % एससी १० मीली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पुनर्लागवड केलेल्या भाजीपाला पिकात तण नियंत्रण करून आणि पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस आलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावे.
तुती रेशीम उद्योग
ढगळ हवामानामुळे रेशीम कीटक संगोपनगृहातील तापमान २० अंश च्या खाली असेल तर कीटक तुती पाने खात नाहीत तसेच २५ ते २८ सें. मर्यादित ठेवण्यासाठी संगोपनगृहात कोळसा शेगडी धूर रहित किंवा इलेक्ट्रीक रूम हिटरचा वापर करावा. तरच रेशीम कीटक तुती पाने खारतात व त्यांची चांगली वाढ होते. तापमान मर्यादित ठेवण्या बरोबर आद्रता ८०-८५ % ठेवण्यासाठी ह्युमिडी फायर चा वापर करावा म्हणजे चांगले कोषाचे उत्पादन वाढ होईल.
टीप : – सदर कृषी हवामान सल्ला पत्रिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून तयार करून प्रसारित करण्यात आली आहे.