भारताने एकूण चाचणीसंख्येचा 14 कोटींचा टप्पा ओलांडला
भारतात गेल्या 24 तासांमध्ये 38,772 जणांना कोविड-19ची लागण झाल्याची नोंद झाली आहे. याचकाळामध्ये देशभरातून 45,333 जण कोरोनामुक्त झाल्याची नोंद झाली आहे. देशात सक्रिय रूग्ण संख्येमध्ये 6,561ने घट झाल्याचे दिसून आले आहे.
भारतामधील सक्रिय रूग्णसंख्येमध्ये सातत्याने घट होत असल्याचे स्पष्ट होत आहे. सध्या देशात 4,46,952 जणांना कोरोना झाला आहे. हे प्रमाण भारताच्या एकूण सकारात्मक रूग्णापैकी 4.74 टक्के आहे.
नवीन सक्रिय रूग्णांच्या तुलनेमध्ये बरे होणा-या रूग्णांच्या प्रमाणात सुधारणा झाली असून रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.81 टक्के आहे. कोरोना आजारातून पूर्ण बरे झालेल्या रूग्णांची संख्या 88,47,600 आहे. सक्रिय रूग्णसंख्या आणि बरे होत असलेल्यांची संख्या यांच्यातील अंतर सातत्याने वाढत असून सध्या ते 84,00648 आहे. म्हणजेच कोरोनामुक्त होणा-यांचे प्रमाण 19.8 पट जास्त आहे.
गेल्या महिनाभरापासून कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये सक्रिय रूग्णसंख्येमध्ये जास्तीत जास्त घट नोंदवली गेली आहे.
मात्र दुसरीकडे मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, दिल्ली, हरियाणा आणि राजस्थानमध्ये सक्रिय रूग्णसंख्या वाढली असल्याचा अहवाल आला आहे.
कोविड-19 विरुद्धच्या लढाईमध्ये भारताने 14 कोटी जणांच्या चाचण्या करून एक महत्वाचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात 8,76,173 जणांची चाचणी करण्यात आली. भारताने आपली चाचणी क्षमता प्रतिदिन 15 लाखांच्यावर नेली आहे.
गेल्या 24 तासांमध्ये देशात सक्रिय झालेल्या कोरोनाबाधितांपैकी दहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 78.31 टक्के रूग्ण नोंदवले गेले.
गेल्या 24 तासांमध्ये केरळमध्ये 5,643 कोरोनाबाधित झाले, त्याखालोखाल महाराष्ट्रात 5,544 नवीन सक्रिय रूग्ण नोंदवले गेले. दिल्लीमध्ये 4,906 नवीन रूग्ण काल दिवसभरात नोंदवले गेले.
नव्याने कोरोनामुक्त झालेल्या एकूण रूग्णांपैकी 76.94 टक्के रूग्ण दहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातले आहेत.
कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या दिल्लीची आहे. दिल्लीतले 6,325जण कोरोना आजारातून बरे झाले. त्याखालोखाल केरळमध्ये कोरोनामुक्तांची संख्या 5,861 आहे. तर महाराष्ट्रामधले 4,362 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
गेल्या 24 तासांमध्ये कोविड-19 या महामारीमुळे 443 जणांचे निधन झाले. यापैकी 78.56 टक्के मृत्यू दहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये झाल्याची नोंद आहे. भारतामध्ये कोरोनाच्या राष्ट्रीय मृत्यूदराचे प्रमाण 1.45 टक्क्यांनी घटले आहे. जागतिक स्तरावर प्रतिदशलक्ष कोरोना मृत्यूदर सर्वात कमी असलेल्या देशांपैकी भारत एक आहे. (सध्या हे प्रमाण 99.4 टक्के आहे)
महाराष्ट्रात गेल्या 24 तासांमध्ये 85 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, हे प्रमाण 19.18टक्के आहे. दिल्लीमध्ये 68 कोरोनाबाधितांचा मृत्यू झला तर पश्चिम बंगालमध्ये 54 जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले.