पाळीव जनावरांना दिले जात आहेत आधारप्रमाणे क्रमांक

 राष्ट्रीय पशुरोग नियंत्रणातर्गत उपक्रम

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत गेल्या महिनाभरापासून राज्यातील अनेक तालुक्यात पाळीव जनावरांना १२ अंकी आधार प्रमाणे क्रमांक पशुविभागामार्फत देण्याचे कामकाज चालू होते .केंद्र शासनाने पाळीव जनावरांनाही क्रमांक देण्याचा निर्णय घेतल्यानंतर या केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत गेल्या महिनाभरापासून पाळीव प्राण्यांना लसीकरण आणि १२ अंकी कार्ड बिल्ला मारण्याचे काम सुरु करत होते आतापर्यंत अशा लाखो जनावरांना लसीकरण आणि बिल्ले मारण्यात आलेले आहेत.

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्यांत या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. केंद्र शासनाने आता पाळीव जनावरणांही आधार प्रमाणे क्रमांक देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत गायी,बैल,म्हैस यांना स्वतःची ओळख मिळवून देण्यासाठी बारा अंकी आधार क्रमांक देण्यात येत आहे. यामुळे जनावरांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. या उपक्रमांतर्गत गाय, बैल,म्हैस यांना लाळ खुरकूत रोग प्रतिबंधक लसीकरण व जनावरांच्या कानाला बिल्ले मारण्याचे काम गेल्या महिनाभरापासून सुरू करण्यात आलेले आहे. आधार कार्ड वर त्याची नोंद एका विशेष प्रणालीवर केली जाणार आहे. जनावरांची परिपूर्ण माहिती ऑनलाईन उपलब्ध होणार आहे.

अन्यथा खरेदी-विक्रीवर मर्यादा

पाळीव प्राण्यांच्या कानात बिल्ला नसल्यास यापुढे त्यांची खरेदी-विक्री करता येणार नसून नैसर्गिक आपत्तीत, विजेच्या धक्क्याने किंवा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जनावर दगावल्यास शासनाची भरपाई मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शिवाय कोणत्याही बँकेत जनावरांवर कर्ज घेतल्यास वा विमा रक्कम मिळण्यासाठी बिल्ला नंबर आवश्यक करण्यात आला आहे.यासाठी सर्व जनावरांची ऑनलाईन नोंदणी केली जाणार आहे. यापुढे शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजना व जनावरांच्या आजारांबाबत या क्रमांकाची गरज भासणार असल्याने पशु पालक शेतकऱ्यांनी आपल्याकडील सर्व जनावरांना बिल्ले मारून त्याची ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे केले जात आहे.