उपचाराधीन रुग्णांची संख्या खाली घसरली

नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची दैनंदिन संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट कायम

देशात गेल्या 24 तासात  45,576 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 48,493 रुग्ण बरे झाले. यामुळे उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत 2917 इतकी घट झाली आहे.

गेले सलग 47 दिवस बरे झालेल्या रुग्णांची संख्या नवीन आढळणाऱ्या रुग्णांच्या  संख्येपेक्षा अधिक नोंदली जात आहे.

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या आज एकूण बाधित रुग्णांच्या संख्येच्या 5% पेक्षा खाली घसरली

नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची दैनंदिन संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत कायम घट होताना दिसत आहे.

देशात सध्या उपचाराधीन  रुग्णसंख्या 4,43,303 इतकी असून ती एकूण कोविड-19 रुग्णसंख्येच्या केवळ 4.95 टक्के इतकी आहे.

नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची दैनंदिन संख्या दर 24 तासांनी वाढत असल्यामुळे रुग्ण बरे होण्याच्या दरात सुधारणा होऊन तो 93.58 टक्के इतका झाला आहे. एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 83,83,602 इतकी झाली आहे. बरे झालेले रुग्ण आणि उपचाराधीन रुग्ण यातील अंतर झपाट्याने वाढत असून ते 79,40,299 इतके आहे.

बरे झालेल्या नवीन रुग्णांपैकी 77.27  टक्के रुग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत.

केरळमध्ये सर्वाधिक 7,066 रुग्ण बरे झाले आहेत. दिल्लीत काल 6,901 रुग्ण बरे झाले तर महाराष्ट्रात 6,608 रुग्ण बरे झाले आहेत.

नवीन नोंद झालेल्या रुग्णांपैकी 77.28 टक्के रुग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत.

गेल्या 24 तासात दिल्लीत 7,486, केरळमध्ये 6,419 तर महाराष्ट्रात 5,011 नवीन रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात नोंद झालेल्या 585 मृत्यूंपैकी 79.49 टक्के मृत्यू 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत.

गेल्या 24 तासात झालेल्या मृत्यूंपैकी 22.39  टक्के म्हणजे 131 मृत्यू दिल्लीत झाले आहेत. महाराष्ट्रात 100 आणि पश्चिम बंगालमध्ये 54  मृत्यूंची नोंद झाली.