दिवाळीनंतर कांद्याचा बाजार खातोय भाव

नाशिक  १९ : दिवाळीनंतर कांदा भाव खाणार असे संकेत कृषी पंढरी ने मागील वृतात दिले होते. ते आता खरे ठरताना दिसत आहे. दिवाळीच्या बंद नंतर मार्केट सुरु झाले असून कांद्याने भाव खाण्यास सुरवात केली आहे. लाल कांद्याला ५ हजार रुपये प्रती क्विंटल दर मिळाले आहे. (संदर्भासाठी पणन मंडळाने दिलेले आजचे बाजारभाव दिले आहेत )

आजपासून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलाव सुरू झाले. लाल कांद्याच्या कमाल भावात बाराशे रुपये तर सरासरी भावात एक हजार रुपयांची वाढ होऊन लाल कांद्याला ५१०१ तर सरासरी ४१०० रुपये भाव मिळाला तर तर उन्हाळ कांद्याला कमाल ४६९० भाव मिळाला.११ नोव्हेंबर ला लाल कांद्याला किमान १३५१ रु दर मिळाला होता त्यात आज दुपटीने वाढ होऊन लाल कांद्याला २७०० रु भाव मिळाला.

दीपावली सणानिमित्त लासलगाव बाजार आवरावर दि ११ ते १८ अशे एक आठवडा भर कांद्याचे लिलाव बंद होते. ११ नोव्हेंबर रोजी उन्हाळ कांद्याला सरासरी ३६०० लाल कांद्याला ३१०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला होता.यंदा परतीच्या पावसाने उन्हाळ आणि लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने कांद्याच्या उत्पादनात घट झालेली आहे.देशावर बाजारपेठेत मागणीच्या प्रमाणात आवक कमी असल्याने कांदा भावात तेजी निर्माण होत आहे.

आज लासलगाव बाजार आवरावर ७२७ वाहनातून ८४८५ क्विंटल उन्हाळ कांदा तर १७ वाहनातून १८० क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. उन्हाळी कांद्याला किमान १४००,कमाल ४६९० तर सरासरी ४२०० रु तर लाल कांदा किमान २७००,कमाल ५१०१ तर सरासरी ४१०० रु दर मिळाला.

शेतमाल: कांदा

दर रु. प्रती क्विंटल

शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

19/11/2020
कोल्हापूर क्विंटल 1677 2000 6000 4000
औरंगाबाद क्विंटल 415 1700 5000 2850
मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 4927 3000 5000 4000
खेड-चाकण क्विंटल 230 3000 5000 4000
श्रीगोंदा- चिंभळे क्विंटल 1272 1500 6315 4900
सातारा क्विंटल 245 2000 5000 3500
मोर्शी क्विंटल 3 2200 4100 3300
कल्याण हायब्रीड क्विंटल 3 3000 4000 3500
अकलुज लाल क्विंटल 147 2000 6000 4800
सोलापूर लाल क्विंटल 5633 200 5800 2000
धुळे लाल क्विंटल 2784 1500 5500 4850
लासलगाव लाल क्विंटल 180 2700 5101 4100
पंढरपूर लाल क्विंटल 174 1650 6500 5000
मनमाड लाल क्विंटल 200 2000 4510 4000
सांगली -फळे भाजीपाला लोकल क्विंटल 561 1200 5500 3300
पुणे लोकल क्विंटल 7656 1500 5200 3350
पुणे- खडकी लोकल क्विंटल 2 2600 2800 2700
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 6 3000 5500 4250
पुणे-मोशी लोकल क्विंटल 105 2500 3500 3000
वाई लोकल क्विंटल 15 3000 5000 4000
कल्याण नं. २ क्विंटल 3 2000 3000 2500
कल्याण नं. ३ क्विंटल 3 1000 2000 1500
येवला उन्हाळी क्विंटल 5000 1800 4786 3500
लासलगाव उन्हाळी क्विंटल 8485 1400 4960 4200
लासलगाव – निफाड उन्हाळी क्विंटल 1415 2000 4551 4000
चाळीसगाव उन्हाळी क्विंटल 340 1751 4351 2900
मनमाड उन्हाळी क्विंटल 3500 1500 4465 3800
कोपरगाव उन्हाळी क्विंटल 1944 2200 4701 3925
पिंपळगाव बसवंत उन्हाळी क्विंटल 11391 1000 6060 4201
वैजापूर उन्हाळी क्विंटल 1536 1500 5500 4000
राहता उन्हाळी क्विंटल 782 900 5200 3750