देशात बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त

दररोजच्या नवीन नोंद झालेल्या रुग्णांपेक्षा नवीन बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त असण्याचा कल भारताने 1.5 महिन्यांपेक्षा अधिक काळ कायम ठेवला आहे. सलग अकराव्या दिवसासाठी देशात 50,000 हून कमी रुग्णांची नोंद झाली आहे.

गेल्या 24 तासात 44,739 कोविड रुग्ण बरे झाले असून 38,617 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येत 6,122 ने घट होऊन आता सक्रिय रुग्णसंख्या 4,46,805 इतकी झाली आहे. एकूण कोविड-19 रुग्णसंख्येपैकी 5.01 टक्के सक्रिय रुग्ण आहेत.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0015D3N.jpg

गेल्या कित्येक आठवड्यांपासून सरासरी दैनंदिन रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट दिसून येत आहे.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002HXUA.jpg

जनतेमध्ये कोविड योग्य वर्तणूकीचा प्रसार केला गेला असला तरी तो व्यापक स्तरावर महत्वपूर्ण आहे कारण युरोप आणि अमेरिका सारख्या देशात कोविड पॉझिटीव्ह रुग्णसंख्येत वाढ होत आहे.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0030KUL.jpg

रुग्ण बरे होण्याच्या दरात सुधारणा होऊन तो 93.53 टक्के इतका झाला आहे. एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 83,35,109 इतकी झाली आहे.

नवीन बरे झालेल्या रुग्णांपैकी 74.98 टक्के रुग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत.

केरळमध्ये सर्वाधिक 6,620 रुग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रात एक दिवसात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 5,123 इतकी आहे तर दिल्लीत 4,421 नवीन रुग्ण बरे झाले आहेत.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0041QJN.jpg

नवीन नोंद झालेल्या रुग्णांपैकी 76.15 टक्के रुग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत.

गेल्या 24 तासात दिल्लीत 6,396, केरळमध्ये 5,792 तर पश्चिम बंगालमध्ये 3,654 नवीन रुग्णांची नोंद झाली.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image005PVT6.jpg

गेल्या 24 तासात नोंद झालेल्या 474 मृत्यूंपैकी 78.9 टक्के मृत्यू 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत.

गेल्या 24 तासात झालेल्या मृत्यूंपैकी 20.89 टक्के म्हणजे 99 मृत्यू दिल्लीत झाले आहेत. महाराष्ट्रात 68 आणि पश्चिम बंगालमध्ये 52 मृत्यूंची नोंद झाली.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image006HSSR.jpg