अलर्ट : महाराष्ट्रात पुन्हा पाऊस बरसणार?

हवामान शास्त्रज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांची माहिती

सध्या दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश तसेच दक्षिण भारतात यंदा दिवाळी मध्ये देखील पाऊस होत आहे तसेच गारपीट देखील झाली आहे. आता महाराष्ट्रावर देखील पावसाचे सावट आहे. येत्या आठवड्यात महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरुपात ढगाळ वातावरण व पाऊस होणार आहे. महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरुपात काही ठिकाणी गारपीट देखील होऊ शकते. त्यामुळे शेतकर्यांनी आपले अन्नधान्य उघड्यावर न ठेवता सुरक्षित ठिकाणी साठवून करावी व ताडपत्री सारख्या आच्छादनिने झाकून ठेवावे. पावसानंतर पुन्हा वेगाने पारा घसरून हुडहुडी भरेल असा अलर्ट हवामान शास्त्रज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी दिला आहे.

किरणकुमार जोहरे

दिल्लीत सध्या सुरू असलेल्या पावसामुळे लवकरच पुन्हा उत्तरे कडून थंड वारे वाहू लागतील परीणामी परत महाराष्ट्रात थंडीच लाट येईल व तापमानात वेगाने व कमी वेळात घसरण होईल. यंदा मराठवाडा रेकॉर्ड ब्रेक थंडी अनुभवणार असुन औरंगाबाद 5 अंशाखाली, मुंबईत डिसेंबर पर्यंत 15 अंशाच्या खाली तर पुण्याचा 7 अंशाखाली नाशिक पुन्हा 4 अंशाखाली तर नागपूर 5 अंशाखाली असा पारा घसरणार आहे. त्यामुळे यंदा केवळ मुंबईकरांना नाही तर औरंगाबादकर आणि मराठवाड्यात देखील नागरीकांना घरबसल्या माथेरान आणि महाबळेश्वरचा फिल अनुभवत हुडहुडी भरेल.

उत्तर प्रदेशातील काही भागात झालेली गारपीट

औरंगाबादकर व नागपूरकर तसेच पुणेकर व नागपूरकर गारठतील. यंदा मराठवाडा हा ढगफुटींचा प्रदेश बनला. आणि अभूतपूर्व पाऊस मराठवाड्यात झाला. 15 डिसेंबरला मान्सून संपणे अपेक्षित असल्याने हिवाळा आणि पावसाळा असे दोन ऋतूंची सरमिसळ पहायला मिळू शकेल. 20 डिसेंबर पासून रॅपिड थंडी वाढणार असून त्यावेळी महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तापमान 5 अंश सेल्सिअसपेक्षा खाली घसरलेले दिसून येईल असे संशोधन निष्कर्ष गेल्या 10 वर्षापासून महाराष्ट्र व भारतील इतर राज्यांतील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना ‘अंदाज नव्हे माहिती!’ ही मोफत हवामान सेवा पुरविणारे हवामान शास्त्रज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी माहिती दिली आहे.

(उत्तर प्रदेश येथे गारपीट झाल्याचे फोटो या बातमीत दिला आहे.)