हमीभावानुसार 47 हजार कोटी रुपयांची धानखरेदी

सुमारे 21.09 लाख शेतकऱ्यांना लाभ; खरीप विपणन हंगाम 2020-21 मध्ये किमान हमीभावानुसार धान्यखरेदी

वर्ष 2020-21 च्या खरीप हंगामात केंद्र सरकारने सध्याच्या किमान हमीभावानुसार धान्यखरेदी सुरु ठेवली आहे.

खरीप 2020-21 वर्षात धान खरेदी अत्यंत सुविहितपणे सुरु असून, पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश यांसह 11 राज्यांतून 248.99 लाख मेट्रिक टन धानखरेदी झाली आहे. या एकूण खरेदीपैकी एकट्या पंजाब राज्यातून 175.24 लाख मेट्रिक टन म्हणजे सुमारे 70.37 टक्के धानखरेदी झाली आहे.

खरीपात सरकारने आतापर्यंत 47010.10 कोटी रुपयांची खरेदी हमीभाभावानुसार केली असून त्याचा लाभ 21.09 शेतकऱ्यांना मिळाला आहे.

राज्यांकडून आलेल्या प्रस्तावांनुसार, या हंगामात, केंद्र सरकारने महाराष्ट्रासह दहा राज्यांना 45.10 लाख मेट्रिक टन डाळी आणि तेलबियांची हमीभावाने खरेदी करण्यासाठी परवानगी दिली आहे. इतर राज्यांकडून असे प्रस्ताव आल्यानंतर त्यांनाही त्याची परवानगी दिली जाईल. 1.23 लाख मेट्रिक टन खोबऱ्याची खरेदी करण्यासाठी परवानगी दिली आहे.

7 नोव्हेंबर 2020 पर्यंत, केंद्र सरकारने आपल्या नोडल संस्थेच्या माध्यमातून, 31988.25 लाख मेट्रिक टन मूग, उडीद, भुईमुगाच्या शेंगा आणि सोयाबीनची खरेदी हमीभावानुसार केली आहे. 171.60 कोटी रुपयांच्या या खरेदीचा लाभ महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा आणि राजस्थान मधील 18949 शेतकऱ्यांना झाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा डाळी आणि तेलबियांच्या खरेदीत 72.64% ची वाढ झाली आहे. गेल्या वेळच्या खरेदीच्या प्रमाणात यंदा डाळी आणि तेलबियांच्या खरेदीत 81.89%  ची वाढ आहे.

खोबऱ्याच्या हमीभावानुसार खरेदीतही यंदा वाढ झाली असून त्याचा लाभ 3961 शेतकऱ्यांना मिळाला आहे.

महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगण या राज्यात, कापसाच्या गासड्याची खरेदी सुरु आहे. 7 नोव्हेंबर 2020 पर्यंत 2952.51कोटी रुपयांच्या 1022074 कापूस गासड्यांची खरेदी झाली, ज्याचा लाभ 198060 शेतकऱ्यांना मिळाला.