सावधान ! योजनेतील कर्ज मिळवून देण्याच्या नावाने फसवणूक

पीएमईजीपी अंतर्गत अर्ज आणि निधी जारी करण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आणि विनामूल्य – एमएसएमई मंत्रालय

केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने सामान्य नागरिकांना आणि संभाव्य उद्योजकांना पंतप्रधानांच्या रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या नावाखाली फसवणूक करण्यापासून सजग केले आहे.

आज प्रसिद्ध केलेल्या निवेदनात एमएसएमई मंत्रालयाने अशी माहिती दिली आहे की पीएमईजीपी योजनेंतर्गत कर्ज देणारी खासगी व्यक्ती किंवा एजन्सीमार्फत संभाव्य उद्योजक/ लाभार्थींकडे संपर्क साधला जात आहे आणि कर्ज मंजुरीची पत्रे हस्तांतरित केली जात आहेत आणि उद्योजकांकडून पैसे आकारून त्यांची फसवणूक केली आहे. आपल्या नावावर सर्वसामान्यांची फसवणूक करण्याविरोधात असामाजिक घटकांना मंत्रालयाने इशारा दिला आहे आणि योग्य तपास आणि कारवाईसाठी मंत्रालयाने यापूर्वीच पोलिसांना याविषयीची माहिती देण्यात आली आहे.

पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (पीएमईजीपी) ही एक केंद्रकृत निधी अनुदान योजना आहे जी 2008-09 पासून देशभरातील सूक्ष्म उद्योगांच्या स्थापनेसाठी पहिल्या पिढीतील उद्योजकांना मदत करण्यासाठी एमएसएमई मंत्रालयाकडून राबविली जात आहे.

पीएमईजीपी योजनेअंतर्गत, अर्जदारांना बँकांकडून कर्ज मंजूरी आणि निधी जारी करण्याची प्रक्रिया खादी व ग्रामोद्योग आयोग द्वारा संचालित केवळ एकाच सरकारी पोर्टलमार्फत ऑनलाईन करण्यात येते. यासाठी https://www.kviconline.gov.in/pmeepeportal/pmegphome/index.jsp हे संकेतस्थळ आहे. संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे निःशुल्क आहे.

पीएमईजीपी प्रकल्पांना प्रोत्साहन आणि मंजुरी देण्यासाठी किंवा पीएमईजीपी योजनेंतर्गत कोणतीही आर्थिक मदत पुरविण्यासाठी कोणत्याही खासगी व्यक्ती/ संस्था/मध्यस्थ/ फ्रॅन्चायझी गुंतलेली किंवा अधिकृत केलेली नाही.

संभाव्य उद्योजक/ लाभार्थी खासगी व्यक्ती किंवा संस्थांकडून पीएमईजीपी योजनेंतर्गत कर्जाची ऑफर घेतात आणि कर्ज मंजुरीची पत्रे देतात आणि उद्योजकांकडून पैसे वसूल करून फसवणूक करतात, हे पूर्णपणे बेकायदेशीर आणि बनावट आहे. अशा असामाजिक तत्वांपासून सावध राहण्याचा सल्ला सामान्य नागरिकांना देण्यात येत आहे.