23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा मृत्यूदर राष्ट्रीय सरासरी मृत्यूदरापेक्षाही कमी झाल्याची नोंद
कोविड-19 वैश्विक महामारीच्या विरोधात सामूहिक लढाईमध्ये भारताला यश मिळत आहे. या आजारामुळे भारतामध्ये मृत्यमुखी पडण्याचे प्रमाण 1.5 टक्क्यांपेक्षाही कमी झाले आहे. आज भारताचा मृत्यूदर 1.49 टक्के आहे. भारतामध्ये प्रति दशलक्ष 88 असा मृत्यूदर आहे.
भारतामध्ये ‘टेस्ट-ट्रॅक- ट्रीट’ ही उपचार रणनीती अवलंबिल्यामुळे भारताचा मृत्यूदर 1.5 टक्क्यांपेक्षा खाली आला आहे. संक्रमण रोखणे तसेच मोठ्या प्रमाणावर चाचण्या करणे आणि वैद्यकीय उपचारांचे प्रमाणीकरणासह प्रभावी व्यवस्थापन करण्यात येत आहे. रूग्णांवर उपचार करताना प्रमाणित पद्धतीचा वापर करण्याकडे लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. त्यामुळे मृत्यूदर कमी होत आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश, केंद्र सरकार, चाचणीनंतर, लागण झालेल्या रूग्णांचे त्वरित विलगीकरण करणे त्यांच्यावरील उपचारांचे वेळेवर योग्य नियोजन करणे हे सर्व अतिशय प्रभावीपणे करीत असल्यामुळे मृत्यूदर कमी होत आहे.
गेल्या 24 तासांमध्ये भारतामध्ये कोरोना आजारामुळे 551 जणांना मृत्यू झाल्याची नोंद आहे. जगामध्ये सर्वात कमी मृत्यूदर असलेल्या देशांपैकी भारत एक आहे. भारताचा दैनंदिन मृत्यूदर सातत्याने कमी होत आहे.
कोविड व्यवस्थापन आणि प्रतिसाद धोरणाचा एक भाग म्हणून अति दक्षता विभागातल्या गंभीर रूग्णांच्या वैद्यकीय व्यवस्थापनामध्ये डॉक्टरांची क्षमता वाढविणे हा अनोखा उपक्रम सरकारने हाती घेतला आहे. यामुळे मृत्यूदर कमी करण्यासाठी मदत होत आहे. नवी दिल्लीच्या एम्सच्या वतीने ‘ई-आयसीयू’ हा उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये सप्ताहातून दोन वेळा- मंगळवारी आणि शुक्रवारी दूर-दृश्य माध्यमातून तज्ज्ञांचे वैद्यकीय पथक देशभरातल्या अतिदक्षता विभागात कार्यरत असलेल्या डाॅक्टरांना मार्गदर्शन करतेऐप. व्हिडिओच्या माध्यमातून ही ज्ञानसत्रे आयोजित केली जात आहेत. हा उपक्रम 8 जुलै, 2020 पासून सुरू झाला आहे.
याचा परिणाम म्हणजे 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा कोविड-19 मृत्यूदर राष्ट्रीय सरासरापेक्षाही कमी आहे.
देशातल्या 5 राज्यांमध्ये एकूण मृत्यंपैकी 65 टक्के रूग्ण मृत्यू पावले आहेत. यामध्ये महाराष्ट्राचे प्रमाण सर्वात जास्त म्हणजे 36 टक्के आहे.
10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात 85% मृत्यू झाल्याची नोंद आहे.
6 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा एकत्रित मृत्यू 100 पेक्षा कमी आहे. तर 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 1000 पेक्षा कमी रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
16 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात 10 हजारांपेक्षा कमी मृत्यू झाल्याची नोंद आहे.
गेल्या 24 तासांमध्ये 59,454 रूग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत कोरोना आजारातून बरे झालेल्या रूग्णांची संख्या 74 लाखांच्या पुढे (7,432,829) गेली आहे. कोरोनातून बरे होणा-या रूग्णांची संख्या दर दिवसाला सातत्याने वाढते आहे. रूग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय 91.34 टक्के आहे.
विशेष म्हणजे भारतामध्ये कोरोनाच्या सकारात्मक रूग्णसंख्येत सातत्याने घट होत आहे. सध्या एकूण बाधित रूग्णांपैकी 7.16 टक्के प्रमाण सक्रिय रूग्णांचे आहे. देशात सध्या 6 लाखांपेक्षा कमी (5,82,649) सक्रिय रूग्ण आहेत.
नव्याने सक्रिय झालेल्या रूग्णांपैकी 10 राज्ये आणि केंद्रप्रदेशातल्या रूग्णांचे प्रमाण 79 टक्के आहे.
कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये एका दिवसात सर्वाधिक रूग्ण बरे झाले ही संख्या 8000 पेक्षाही जास्त आहे. त्या खालोखाल केरळमधले 7,000 पेक्षा जास्त रूग्ण बरे झाल्याची नोंद आहे.
गेल्या 24 तासांमध्ये देशात 48,268 जणांना कोरोनाची नव्याने बाधा झाली.
नवीन लागण झालेल्या रूग्णांपैकी 78 टक्के रूग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत. केरळ आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 6,000 पेक्षा जास्त लोकांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच त्याखालोखाल दिल्लीमध्ये 5,000 पेक्षा जास्त लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे दिसून आले आहे.
गेल्या 24 तासांमध्ये कोरोनामुळे 551 जणांचे निधन झाले. यापैकी जवळपास 83 टक्के रूग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातले आहेत.
महाराष्ट्रामधल्या 127 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, हे प्रमाण 23 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.