कोरोनाशी लढा देण्यासाठी स्वत:बद्दल जागरुक रहा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, अन् निरोगी रहा, असा सल्ला आयुष मंत्रालयाने दिला आहे. प्रादेशिक आयुर्वेदीक माता व बाल आरोग्य संशोधन केंद्र, नागपूर ही केंद्रीय आयुर्वेदीय विज्ञान संशोधन परिषद, नवी दिल्ली, आयुष मंत्रालय, भारत सरकारच्या अंतर्गत येणारी संस्था असून या संस्थेमध्ये मुख्यत: माता आणि बालकांच्या निरोगी आरोग्यावर संशोधन यावर लक्ष केंद्रीत केले गेले आहे.
कोविड – 19 च्या उद्रेकामुळे, जगभरातील संपूर्ण मानवजातीला त्रास होत आहे. इष्टतम आरोग्य राखण्यात शरिराची रोगप्रतिकार शक्ती वाढविणे महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. आपल्या सर्वांना माहित आहे की व्याधीवर नियंत्रण हे व्याधीचे उपचार करण्यापेक्षा कधीही चांगले असते. आतापर्यंत कोविड-19 चे कोणतेही औषध नाही.
यासंदर्भात प्रादेशिक आयुर्वेदीक माता व बाल आरोग्य संशोधन केंद्र, नागपूर येथील प्रभारी सहायक निदेशक डॉ. आर. गोविंद रेड्डी यांनी कोरोना विषाणूचे संक्रमण हा सध्या सर्वात दुर्धर आजार असल्याचे सांगितले. डॉ. रेड्डी यांच्या मते, या काळात आपल्या शरीराच्या रोगप्रतिकार शक्तीला चालना देणारे उपाय करणे चांगले होईल.
कोरोनाशी लढा देण्यासाठी स्वत:बद्दल जागरुक आणि शरीराशी रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, अन निरोगी रहा, असा सल्ला आयुष मंत्रालयाने जनतेला दिला आहे. तसेच आयुर्वेदात वर्ण केलेले दिनचर्या आणि ऋतुचर्या यांचे पालन करण्यास सांगितलेले आहेत.
डॉ. रेड्डी यांनी सांगितले की, आयुष मंत्रालयाने श्वसन केंद्र आरोग्याच्या संदर्भात विशेष प्रतिबंधात्मक उपाय सांगितलेले आहेत. हे उपाय आयुर्वेदिक साहित्य व वैज्ञानिक प्रकाशने यावर आधारित आहेत.
सामान्य उपाय : दिवसभर गरम पाणी प्या, कमीतकमी 30 मिनिटांसाठी योगासन, प्राणायाम आणि ध्यान धारणा करावी. हळद, जिरे, धने आणि लसणचा जेवणामध्ये वापर करावा.
आयुर्वेदानुसार रोगप्रतिकार शक्ती वाढविणे : च्यवनप्राश 10 ग्रॅम एक चमच सकाळी घ्या. मधुमेह असलेल्यांनी शुगर फ्री च्यवनप्राश घ्यावे. दिवसातून एक किंवा दोनदा तुळशी, दालचिनी, काळी मिरची, सुंठ (कोरडे आले) आणि मनुका टाकून बनविलेला हर्बल चहा / काढा प्यावा. आवश्यक असल्यास गूळ (नैसर्गिक साखर) आणि ताजा लिंबाचा रस टाकावा. अर्धा चहाचा चमचा हळद चूर्ण 150 मिली गरम दुधात टाकून दिवसातून एकदा किंवा दोनदा घ्या. याला गोल्डन मिल्क (सुवर्ण दूध) म्हणतात.
सोपे आयुर्वेदिक कर्म : तीळतेल, नारळतेल किंवा तूप दोन्ही नाकपुड्यांमध्ये सकाळ आणि संध्याकाळी लावा. याला प्रतिमर्श नस्य म्हणतात. एक चमचा तीळतेल किंवा खोबरेल तेल तोंडात घ्या. गिळू नका, 2 ते 3 मिनिटे तोंडात फिरवा आणि त्यानंतर थुंकून घ्या. त्यानंतर कोमट पाण्याच्या गुळण्या करा. दिवसातून एकदा किंवा दोनदा हे करता येते.
कोरडा खोकला, घशा खवखवणे या अवस्थेमधे : ताजे पुदीनाची पाने किंवा अजवाईन यांचे स्टीम इनहेलेशन (वाफ) दिवसातून एकदा घ्या. खोकला किंवा जळजळ झाल्यास लवंग पावडर मधात मिसळून दिवसातून तीनदा घ्यावे.
सामान्यत: कोरडा खोकला आणि घसा खवखवणे यावर या उपाययोजना केल्यास आराम होतो. तथापि ही लक्षणे कायम राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
डॉ. आर गोविंद रेड्डी
प्रभारी सहायक निदेशक (आयु)