तरीही कांदा भाव खाणारच ! कारण…

निर्यातबंदीनंतर किमान 25 मे. टनापेक्षा कांदा साठविता येणार नाही, अशी अट घातल्याने मागील दोन दिवसांपासून कांदयाचे माहेरघर समजल्या जाणाºया लासलगाव बाजारसमितीत व्यापाºयांनी कांदा लिलाव बंद केले. परिणामी शेतकºयांचे नुकसान झाले. काही शेतकºयांना थेट नाशिक येथे कांदा आणावा लागला, तिथे काल सरासरी चार हजारापर्यंत भाव मिळाला, पण वाहतुक खर्च झाला. यंदा हवामानामुळे कांदा लागवड वाढूनही लाल (पोळ) कांदद्याचे उत्पादन कमी आले आहे. जाणकारांच्या माहितीनुसार तब्बल 70 टक्के उत्पादन घट आहे.

परिणामी कांद्याच्या किंमती वाढत असून ऐन निवडणुकांच्या हंगामात त्या नियंत्रणात ठेवण्यासाठीच सरकार निर्यातबंदी, आयातीला चालना, साठवणुकीवर मर्यादा अशी पावले उचलत आहेत. मात्र या क्षेत्रातील अभ्यासकांच्या अंदाजानुसार सरकारचा हा केवळ निवडणुक आणि मीडियात बातमी आणण्यासाठी केलेला प्रयत्न असून कांद्याच्या किंमती यंदाही वाढत्या राहणार आहेत, आणि काहीही प्रयत्न केले तरी कांदा भाव खाणारच आहे. शेतमालाचे अभ्यासक दीपक चव्हाण यांनी यावर आपले अभ्यासू मत मांडले आहे. ते म्हणतात की कांद्याचे मार्केट आता दबणार नाही..

त्यांनी मांडलेले मुद्दे आणि मागण्या अशा ;

1. सरकारी कंपनी ‘एमएमटीसी’ देखिल लवकरच कांदा आय़ातीचे टेंडर काढेल, असे वृत्त आहे. गेल्या वर्षी एमएमटीसीकडील आय़ातीत कांदा पोर्टवर सडला होता.

2. खासगी कांदा आयातही सुरू आहे. व्यापाऱ्यांकडील आयातीत मालाचे आकारमान दैनंदिन मागण्याच्या तुलनेत अत्यल्प आहे. त्याने बाजार फारसा दबणार नाही.
3. स्टॉक लिमिटनंतर देशभरात कांद्याचे रेट थोडे दबले. अशा कारवाईमुळे बाजाराचे सेंटिमेंट तात्पुरते खराब होते. काही स्टॉकिस्टकडून पॅनिक सेलिंग होते. गेल्या वर्षीचा अनुभव बोलका आहे.
4. ‘नाफेड’कडे आजघडीला सुमारे 22 हजार टन कांदा शिल्लक असून, दक्षिणेतील केरळ व पुर्वोत्तर बिगर कांदा उत्पादक राज्यांत रेशनिंगद्वारे वितरित होईल.
5. देशांतर्गत खरीप कांद्याचे पाऊसमानामुळे खरोखरच 70 टक्क्यापर्यंत नुकसान झाले असेल, तर आयातीत माल, स्टॉक लिमिट, बफर साठा विक्री अशा उपायांमुळे मार्केट दबणार नाही.
6. स्टॉक लिमिट असो वा आयातीचे टेंडर – कांदा टंचाईबाबत केवळ डॅमेज कंट्रोलसाठी आणि माध्यमांना उत्तर देण्यापुरतेच हे उपाय काम करतात.
7. कांदा ही सडत जाणारी संपत्ती decaying asset आहे. तेजीबाबत विशिष्ट उंच धारणा धरून – कांद्याच्या टिकवण क्षमतेबाबत व्यवहारी

कांदा लिलाव बंदबाबत राज्य शासनाने हस्तक्षेप करावा

कांदा लिलाव सुरू करावेत, अशी शेतकऱ्यांची रास्त भूमिका आहे.व्यापाऱ्यांनी स्टॉक लिमिटचे निमित्त देत बाजार बंद ठेवले आहेत. स्टॉक लिमिटचे शेतकरी समर्थन करत नाहीत. सरकार चुकीचे निर्णय घेते म्हणून व्यापारी बाजार बंद करतात. यात शेतकऱ्यांचा बळी जातो. जून्या कांद्याची टिकवण क्षमता दिवसेंदिवस घटतेय. तो रोखून धरता येत नाही.
“काही व्यापारी प्रवृत्ती सध्याच्या स्टॉक लिमिटचे निमित्त करून कमी रेटमध्ये शिवार खरेदी करतील आणि नंतर चढ्या भावाने विकतील” असा आरोप शेतकरी करत आहेत.
व्यापारी संघटित असतात. प्रशासनासोबत त्यांचे उत्तम संबंध असतात. त्याचा उपयोग करावा. गेल्या वर्षीसारखा तोडगा काढावा.
व्यापारी – अडतदार किंवा हमाल-मापारी त्यांचे हितसंबंध अडचणीत आले की तत्काळ, नियमबाह्य पद्धतीने बाजार बंद करतात. ही मनमानी आहे. हे नेहमीचेच आहे.
राज्य शासनाने केंद्राच्या स्टॉक लिमिटला आव्हान दिले पाहिजे. केंद्रातील अधिकारी स्थानिक परिस्थितीचा विचार न करता, दिल्लीत बसून वाटेल तसे निर्णय घेतात. राज्य शासनाने तत्काळ केंद्राकडे पाठपुरावा करून राज्यापुरती अट शिथिल करून घ्यावी, किंवा स्थानिक प्रशासनाला याबाबत योग्य ते निर्देश द्यावेत. गेल्या चार दिवसांपासून राज्य सरकारकडून याबाबत काहीही कार्यवाही नाही, हे आश्चर्यकारक आहे.
चार-चार दिवस बाजार बंद ठेवण्याच्या व्यापाऱ्यांच्या भूमिकेबाबत कांदा उत्पादक संतप्त आहेत. शेतकऱ्यांच्या असंतोषाचा भडका उडून काही परिस्थिती उद्भभवली तर जबाबदारी कोणाची?
  • दीपक चव्हाण, शेतमाल भाव अभ्यासक

आजचे कांदा दर (सौजन्य : पणन मंडळ )

शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत

कमी दर

जास्तीत

जास्त दर

सर्वसाधारण

दर

27/10/2020
कोल्हापूर क्विंटल 1733 2000 5500 4000
औरंगाबाद क्विंटल 471 1000 5000 3000
मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 5488 5000 7000 6000
सातारा क्विंटल 66 2000 6000 4000
नांदूरा क्विंटल 11 1000 4000 4000
जुन्नर -आळेफाटा चिंचवड क्विंटल 3322 3010 8010 6010
कराड हालवा क्विंटल 117 3500 6500 6500
कल्याण हायब्रीड क्विंटल 3 7500 8000 7750
सोलापूर लाल क्विंटल 5411 100 6500 2000
नागपूर लाल क्विंटल 2250 4000 6000 5500
सांगली -फळे भाजीपाला लोकल क्विंटल 560 1000 5500 3200
पुणे लोकल क्विंटल 6385 1000 6500 3750
पुणे- खडकी लोकल क्विंटल 4 3600 6000 4300
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 1 5000 5000 5000
पुणे-मोशी लोकल क्विंटल 124 3000 5500 4250
मलकापूर लोकल क्विंटल 89 2925 4300 3425
वाई लोकल क्विंटल 20 2500 5000 3750
कल्याण नं. २ क्विंटल 3 6000 7000 6500
कल्याण नं. ३ क्विंटल 3 4000 6000 5000
नागपूर पांढरा क्विंटल 52 4000 6000 5500
राहूरी उन्हाळी क्विंटल 4721 500 6000 5000
मनमाड उन्हाळी क्विंटल 15 3699 3699 3699
राहता उन्हाळी क्विंटल 857 1000 5100 3950