दोन महिन्यानंतर प्रथमच सक्रीय रुग्णांची संख्या 7 लाखापेक्षा कमी

24 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशात 20,000  कमी सक्रीय रुग्ण

कोविड विरोधातल्या लढ्यात भारताने महत्वाचा टप्पा पार केला आहे. दोन महिन्यानंतर (63दिवस ) देशात प्रथमच सक्रीय रुग्णांची संख्या 7 लाखापेक्षा कमी नोंदवली गेली आहे. 22 ऑगस्टला सक्रीय रुग्णांची संख्या 7 लाखाच्या खाली (6,97,330) होती.

देशात आज सक्रीय रुग्णांची संख्या ( 6,95,509 )  इतकी आहे, जी  एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 8.96 टक्के इतकी आहे.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0015BSZ.jpg

कोरोनातून  बरे होणाऱ्यांची दर दिवशीची मोठी संख्या त्याच बरोबर कमी मृत्यू दर यामुळे सक्रीय रुग्णांच्या संख्येत घट होण्याचा भारताचा कल सुरु राहिला आहे.

भारतात कोरोनातून  बरे होणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. बरे झालेल्यांची एकूण संख्या 70 लाखाच्या जवळ(69,48,497)पोहोचली आहे. सक्रीय रुग्ण आणि बऱ्या  झालेल्या व्यक्ती यांच्यातले अंतर सातत्याने  वाढत असून आज हे अंतर  62,52,988 होते. बरे झालेल्यांची संख्या ही सक्रीय रुग्णांपेक्षा 10 पट जास्त आहे.

देशात गेल्या 24 तासात 73,979 रुग्ण कोरोनातून बरे झाले तर 54,366 नव्या रुग्णांची नोंद झाली. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर वाढून 89.53% झाला आहे.

देशभरात व्यापक करण्यात आलेल्या वैद्यकीय पायाभूत सुविधा, केंद्राच्या मानक उपचार विषयक नियमावलीची  राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडून अंमलबजावणी, डॉक्टर,निम वैद्यकीय आणि आघाडीच्या कर्मचाऱ्यांची निष्ठा यामुळे बरे होणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ तर मृत्युदरात घट होत राहिली आहे. आज हा दर 1.51% आहे.

24 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशात 20,000 पेक्षा कमी सक्रीय रुग्ण आहेत.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002V7YZ.jpg

नव्याने बरे झालेल्यांपैकी 81% व्यक्ती  10 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशात आहेत.

महाराष्ट्रात एका दिवसात 16,000 पेक्षा जास्त जण कोरोनातून बरे झाले. कर्नाटकमध्ये ही संख्या 13,000 पेक्षा जास्त आहे.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003ZGRO.jpg

गेल्या 24 तासात 54,366  नव्या रुग्णांची नोंद झाली. यापैकी 78% रुग्ण 10 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशात आहेत. महाराष्ट्र आणि केरळ मध्ये नव्या रुग्णांची संख्या जास्त असून  या राज्यांमध्ये 7,000 पेक्षा जास्त रुग्ण आहेत, त्यानंतर कर्नाटक मध्ये 5,000 रुग्ण आढळले आहेत.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004KUP1.jpg

गेल्या 24 तासात  690 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी सुमारे 81% मृत्यू 10 दहा राज्ये/केंद्र शासित प्रदेशातले आहेत.

यामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 198 मृत्यूंची नोंद झाली.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image005D5K2.jpg