कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या साडे तेरा लाखांवर
मुंबई, दि.१७ : राज्यात दररोज कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून आज १४ हजार २३८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८५.६५ टक्के एवढे झाले आहे. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या साडे तेरा लाखांवर गेली असून राज्यातील उपचाराखाली असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या देखील कमी होऊन १ लाख ८५ हजार २७० एवढी कमी झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८० लाख ६९ हजार १०० नमुन्यांपैकी १५ लाख ८६ हजार ३२१ नमुने पॉझिटिव्ह (१९.६६ टक्के) आले आहेत. राज्यात २३ लाख ९५ हजार ५५२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २३ हजार ७४९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २५० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६५ टक्के एवढा आहे.
आज निदान झालेले १०,२५९ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले २५० मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) :
मुंबई मनपा-१७९१ (४७), ठाणे- १६१ (६), ठाणे मनपा-३२६ (४), नवी मुंबई मनपा-२६१ (५), कल्याण डोंबिवली मनपा-२५२, उल्हासनगर मनपा-३४, भिवंडी निजामपूर मनपा-२४ (१), मीरा भाईंदर मनपा-११६ (५), पालघर-५६ (३), वसई-विरार मनपा-१३० (३), रायगड-११५ (३), पनवेल मनपा-१४३ (२), नाशिक-१०६ (३), नाशिक मनपा-२२७ (३), मालेगाव मनपा-११, अहमदनगर-२८३ (२), अहमदनगर मनपा-९८ (२), धुळे-४६, धुळे मनपा-२८, जळगाव-१९५ (१), जळगाव मनपा-२९, नंदूरबार-३०, पुणे- ३४६ (१०), पुणे मनपा-४१७ (२२), पिंपरी चिंचवड मनपा-१९७ (८), सोलापूर-१८४ (९), सोलापूर मनपा-४० (९), सातारा-३४५ (९), कोल्हापूर-६२ (५), कोल्हापूर मनपा-२२ (२), सांगली-१५४ (१३), सांगली मिरज कुपवाड मनपा-३०, सिंधुदूर्ग-३० (२), रत्नागिरी-४५ (४), औरंगाबाद-७१,औरंगाबाद मनपा-११७ (४), जालना-९४ (२), हिंगोली-३३ (१), परभणी-६, परभणी मनपा-९, लातूर-४८ (१), लातूर मनपा-४२, उस्मानाबाद-५७ (४), बीड-१२९ (११), नांदेड-४२, नांदेड मनपा-७१ (१), अकोला-२५, अकोला मनपा-३१, अमरावती-६५ (१), अमरावती मनपा-४३ (३), यवतमाळ-१३१ (३), बुलढाणा-१२७, वाशिम-७१ (३), नागपूर-३८६ (९), नागपूर मनपा-१७९४ (१३), वर्धा-११८ (३), भंडारा-९४ (४), गोंदिया-१०७ (१), चंद्रपूर-९९ (१), चंद्रपूर मनपा-३८ (१), गडचिरोली-२७ (१), इतर राज्य-५०.