अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री सोमवारी सोलापूर दौऱ्यावर

मुंबई दि 17 : राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी, ग्रामथ यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोमवार 19 रोजी सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत

सकाळी 09:00 वा.सोलापूर विमानतळ येथे आगमन व मोटारने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण
सकाळी 09:30 वा.सोलापूर येथून मोटारने सांगवी खूर्द ता. अक्कलकोट, जि. सोलापूरकडे प्रयाण (अक्कलकोट मार्गे) , सकाळी 10:45 वा. सांगवी खूर्द येथे आगमन व नैसर्गिक आपत्तीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी व ग्रामस्थांशी चर्चा
सकाळी 11:00 वा. सांगवी पूलाकडे प्रयाण व बोरी नदीची व पूरग्रस्त भागाची पाहणी, सकाळी 11:15 वा. अक्कलकोट शहरकडे प्रयाण, सकाळी 11:30 वा. अक्कलकोट शहर येथे आगमन व हत्ती तलावाची पाहणी, सकाळी 11:45वा. अक्कलकोट येथून रामपूकडे प्रयाण,
दुपारी 12:00 वा.रामपूर येथे आगमन व अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची व शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी
दुपारी 12:15 वा.रामपूर येथून बोरी उमरगे ता. अक्कलकोटकडे प्रयाण,
दुपारी 12:30 वा.बोरी उमरगे येथे आगमन आपत्तीग्रस्त घरांची व शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी,
दुपारी 12:45 वा.बोरी उमरगे ता. अक्कलकोट येथून सोलापूरकडे प्रयाण,
दुपारी 03:00 वा. पूरपरिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा, व अभ्यागताच्या भेटी व नंतर सोलापूर विमानतळ येथे आगमन व मुंबईकडे प्रयाण

एकही शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

पंढरपूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची व चंद्रभागा नदीवरील कुंभारघाटाची उपमुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

पंढरपूर, दि. १७ : गेल्या चार-पाच दिवसांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात झाले आहे. घरांची पडझड झाली आहे. नुकसानभरपाई पासून एकही नुकसानग्रस्त वंचित राहणार नाही याची दक्षता घेऊन, वस्तुनिष्ठ पंचनामे करून अहवाल सादर करावा, असे निर्देश  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अतिवृष्टीमुळे पंढरपूर तालुक्यात नुकसान झालेल्या पिकांची व चंद्रभागा नदीवरील कुंभारघाट येथे भेट देवून पाहणी केली. कुंभारघाटावरील संरक्षित भिंत कोसळल्यामुळे सहा जण मरण पावलेल्या कुंटुबियांच्या नातेवाईकांची भेट उपमुख्यमंत्री अजित पवार यानी घेतली.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, परतीच्या पावसाने अतिवृष्टी झाल्यामुळे महाराष्ट्रात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये प्रचंड प्रमाणात हानी झाली आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीसोबतच घरांचे व पशुधनाचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांचे व घरांचे तातडीने पंचनामे करावेत. पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून  सुरु असलेल्या घाटांचा तसेच इतर कामांचा दर्जा व गुणवत्ता चांगली राहिल, याबाबत संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी.  घाटबांधकामाबाबत चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले

 

पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली, कासेगांव येथील गावांना भेट देवून  नुकसानग्रस्त पिकांची तसेच पूरग्रस्त भागांची पाहणी  उपमुख्यमंत्री  अजित पवार यांनी केली. यावेळी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सरसकट पिकांचे पंचनामे करावेत, असे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले.