सावधान : शेतमाल विकताना अशी घ्या काळजी. पोलिसांच्या सजगतेमुळे व्यापाºयांकडून शेतकºयांचे दोन कोटी परत
नाशिक, ता. 6 : शेतकºयांकडून शेतमाल घेऊन त्यांना मोबदला न देता फसवणूक करणाºया व्यापाºयांना पोलिसांनी चांगलाच दणका दिला असून अशा अनेक व्यापाºयांवर गुन्हे नोंदवत त्यांच्याकडून सुमारे दोन कोटी रूपयांची वसूली करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात व्यापाºयांकडून शेतकºयांना फसविले जाण्याच्या घटना वारंवार होत होत्या मात्र शेतकरी जागृत होऊन त्याविरोधात पुढे आल्याने आणि पोलिसांनीही सकारात्मक प्रतिसाद देत कारवाईचा बडगा उगारल्याने आतापर्यंत जिल्ह्यात 79 व्यापाºयांविरोधात गुन्हे दाखल होऊन त्यांच्याकडून शेतकºयांना दोन कोटी रूपयांपेक्षा जास्त रक्कम शेतकºयांना मिळवून देण्यात यश आले आहे. नाशिकचे जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी ही माहिती दिली.
अशी आहे फसवणूकीची पद्धत
नाशिक जिल्ह्यात द्राक्ष, डाळिंब यासारखे फळपिके खरेदी करण्यासाठी आलेले परप्रांतिय व्यापारी सुरूवातीचे दोन वर्षे शेतकºयांना रोख पैसे देऊन त्यांचा शेतमाल खरेदी करतात. त्यामुळे शेतकºयांचा त्यांच्यावर विश्वास बसतो. एकदा का असा विश्वास संपादन केला की पुढे शेतमालाचे पैसे नंतर देऊ असे सांगून शेतकºयांकडून शेतमाल खरेदी करून तो पैसे न देतात फरार होतो आणि शेतकºयाची मात्र फसवणूक होते. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 550 शेतकºयांची फसवणूक झाल्याचे उजेडात आले असून ही संख्या अधिक असू शकते. मात्र त्यापैकी 79 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही व्यापारी गावे बदलत असल्याचे लक्षात आल्याचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले. त्यामुळे त्यांचा माग काढण्यात अडचणी येतात. त्यांच्या गुन्ह्याचा प्रकारामागे संघटीत टोळी आहे का? असाही तपास सुरू असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
!! प्रेस नोट !! pic.twitter.com/UBSX1jDgL8
— NASHIK RURAL POLICE (@SPNashikRural) September 14, 2020
काही दिवसांपूर्वी नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी शेतकºयांना फसवणाºया व्यापाºयांवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर अनेक शेतकºयांना व्यापाºयांनी शेतमालाचे पैसे खात्यात जमा केले. मात्र तरीही काही व्यापाºयांनी आपला हेका न सोडल्याने शेतकºयांनी थेट पोलिस महानिरीक्षक दिघावकर यांना निवेदनाद्वारे तक्रार दिली होती. त्यांनी तातडीने कारवाई करण्याची भूमिका घेतल्याने धाबे दणाणलेल्या व्यापाºयांने शेतकºयांचे पैसे तत्काळ खात्यावर वर्ग केले. इतकेच नव्हे, तर संबंधित व्यापाºयांवर गुन्हेही नोंदविण्यात आले.
विशेष पोलिस महानिरीक्षक दिघावकरांचा दणका
नाशिक जिल्हा हा द्राक्ष, कांदा, डाळिंब आणि भाजीपाल्याचे आगर म्हणून ओळखला जातो. द्राक्षाच्या हंगामात अनेक व्यापारी गावांमध्ये आपल्या पेढ्या थाटत शेतकºयांकडून शेतमाल विकत घेतात. मात्र अनेकदा बनावट चेक देणे, मालाचे पैसे न देता पळून जाणे, पैशांत फसवणे, बनावट नोटा देणे यांसारखे प्रकार करून शेतकºयांच्या घामाचे पैसे बुडवतात. बरेचदा हे व्यापारी परप्रांतीय असल्याने शेतकºयांचा शेतमाल घेऊन पळून गेल्यानंतर त्यांचा माग काढणे शेतकºयाला जिकीरीचे होऊन बसते. डाळिंब, भाजीपाला, कांदा, कापूस, धान्य या शेतमालातही अशी फसवणूक होताना दिसत आहे. आधीच अस्मानी आणि सुलतानी संकटातून सावरत बळीराजा मोठ्या क ष्टाने आणि मेहनतीने शेती पिकवतो, पण त्यात असे प्रकार घडल्यानंतर त्याचे प्रचंड नुकसान होऊन तो कर्जबाजारी होतोच. अनेक शेतकºयांनी या प्रकारामुळेर आत्महत्येचा मार्गही पत्करल्याच्या घटनाही घडल्या होत्या. मात्र या वेळेस शेतकरी सजग होताना दिसून येत असून अनेक शेतकरी आता व्यापाºयांविरोधात थेट तक्रारी नोंदवत आहेत. पोलिसांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याने शेतकºयांना त्यांचे हक्काचे पैसे मिळू लागल्याचे समाधान आहे.
काय काळजी घ्याल?
1. शक्यतो व्यापाºयाशी सर्व व्यवहार रोखीत करावा. सध्याच्या नव्या आर्थिक नियमांमुळे अनेकदा मोठया रकमेचे व्यवहार बॅक खात्यामार्फत करावे लागतात. अशा वेळेस शेतमाल दिल्यानंतर तत्काळ बॅँकेत पैसे जमा करायला सांगावे. पैसे जमा झाल्याची खात्री करावी.
2. अनेकदा व्यापारी बांधावर शेतमाल खरेदी करतात. त्यांच्याकडून किमान 60 टक्के रक्कम आगाऊ घ्यावी आणि नंतरच शेतमाल विक्री करावी.
3. बरेचदा हे व्यापारी स्थानिक लोकांना नोकरीवर ठेवतात, त्यांच्या ओळखीचा फायदा करून फसवणूक होते. अशा वेळी शेतकºयांनी संबंधित व्यापाºयाची सर्व माहिती करून घ्यावी. तसेच त्याचे पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, रहिवासी पुरावा इत्यादी माहिती शक्य झाल्यास जवळच्या पोलिस स्थानकात देऊन त्याची खात्री करवून घ्यावी.
4. अनेकदा शेतमाल विक्री करताना शेतकरी घाई करतात. त्यामुळे कुणाच्या तरी ओळखीने किंवा सल्लयाने घाईने शेतमाल विक्री केली जाते. अशा वेळी फसवणूक होऊ शकते.
5.शक्य झाल्यास संबंधित व्यापारी व त्याच्या कर्मचाºयांचा मोबाईलमध्ये स्पष्ट असा फोटो काढून घ्यावा. व्हिडिओही काढावा. जेणे करून भविष्यात त्याने फसवणूक केली, तर त्याच्यावर कारवाई करणे सोपे जाते.
6. अनेकदा परप्रांतिय व्यापारी स्थानिक शेतकºयांमध्ये फूट पाडतात. उदा. एखाद- दुसºया शेतकºयाला थोडे जास्त पैसे देऊन आपलंसं करून घेतात. त्यामुळे भविष्यात त्यांनी गुन्हा केला, तरी असे शेतकरी मग आवाज उठवत नाहीत आणि व्यापाºयाचा उद्देश सफल होतो.
7 हे सर्व टाळण्यासाठी शेतकºयांनी एकी करणे, संघटीत होणे आवश्यक असते. तसे केल्यास संबंधित व्यापाºयावर दबाव येतो आणि तो फसवणूक करत नाही.
8. इतके करूनही जर दिलेल्या वायदयाप्रमाणे मालाचे पैसे दिले नाही, तर थेट पाेिलस स्थानकात न घाबरता किंवा न संकोचता तक्रार नोंदवावी, तसेच स्थानिक स्वराज्य संस्था, कृषी अधिकारी, तहसिलदार आणि शेतकरी संघटना यांनाही या प्रकाराची लेखी कल्पना द्यावी.
9. आजकाल व्हॉटस्अप, फेसबुक सारख्या सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. फसवणूक झालेल्या व्यापाºयाची माहिती सोशल मीडियातून उघड केल्यास इतर शेतकरी सावध होऊ शकतात. तसेच हा व्यापारी दबावात येऊन अशी फसवणूक करण्याचे टाळू शकतो.