संबंधित वाहिनीवरील ८० टक्के ग्राहकांनी चालू वीजदेयक भरणे बंधनकारक
मुंबई- रात्रीच्या वेळेस कृषिपंपांना देण्यात येणाऱ्या वीजपुरवठयामध्ये येणाऱ्या अडचणी, शेतकरी व लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या विधायक सूचना विचारात घेऊन शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेद्वारे उपकेंद्राजवळ सौर ऊर्जा प्रकल्प उभारुन निर्माण होणारी वीज कृषी वाहिनीद्वारेशेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यात येणार आहे, असे ऊर्जामंत्री ना.डॉ नितीन राऊत यांनी सांगितले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंतीचे औचित्य साधून राज्यातील किमान ५० वीज वाहिन्यावरील सुमारे २५ हजार शेतकऱ्यांना दिवसा वीजउपलब्ध करुन देण्याबद्दल ऊर्जामंत्र्यांनी निर्देश दिले होते, त्यानुसार ही योजना सुरू करण्यात आली आहे.
राज्यातील कृषिपंपाच्या थकबाकीचा आकडा हा व्याज व दंडासहित सुमारे ४२००० कोटी रु. पर्यंत पोहचला आहे व कृषीपंपाच्या थकबाकीसंबंधाने स्वतंत्र धोरणकरण्याची बाब महाराष्ट्र शासनाच्या विचाराधीन आहे.
तथापि सध्याची महावितरणची आर्थिक परिस्थिती बघता वरील योजनेची अंमलबजावणी करतेवेळेस त्या वीजवाहिन्यावरील किमान ८० टक्के कृषी ग्राहकांनी चालू वीजबिलांचा भरणा करणे अपेक्षित आहे.
सदर योजना यशस्वी करण्याकरिता आणि शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करुन देण्याकरिता वरील उपकेंद्रातील वाहिन्यांवरील ग्राहकांनी चालू वीजबिलभरुन उपकेंद्राजवळ सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी शासकिय अथवा खाजगी जागा उपलब्ध करुन देण्याकरिता महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन ऊर्जामंत्रीडॉ.नितीन राऊत यांनी केले आहे.
सद्यस्थितीत महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या मान्यतेनुसार राज्यातील कृषिपांना दिवसा ८ तास व रात्री १० तास आठवडयात चक्राकार पध्दतीने तीन फेजवीजपुरवठा उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क – मुख्य जनसंपर्क अधिकारी, दूरध्वनी क्र.022-26474536