द्राक्ष बागेमधे ईथरेलच्या वापरावर अनेक गोष्टी अवलंबून

नाशिक : द्राक्ष बागांचा गोड़ेबहाराच्या छाटन्या सुरु झाल्या आहेछाटणी आधी होणाऱ्या इथरेलचा वापर योग्य प्रमाणात होणे गरजेचे आहे तसे न झाल्यास वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते असे डॉ. जयराम खिलारी यांनी सांगितले ते वडनेर भैरव येथे द्राक्ष उत्पादक किशोर मोहिते यांच्या शेतात सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून आयोजित कार्यक्रमात बोलत होते.यावेळी   द्राक्ष मार्गदर्शक विश्वेश कराड़ेद्राक्ष उत्पादक किशोर मोहिते यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो उत्पादक उपस्थित होते.

श्री खिलारी पुढे म्हणाले कीद्राक्ष शेतीत नवनवीन संकट उभे राहत आहे गेल्या हंगामात कोरोनाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले यातून सावरण्यासाठी द्राक्ष उत्पादकांनी या हंगामाचे योग्य तऱ्हेने नियोजन करने गरजेचे आहेयाचबरोबर इथ्रेलचा वापर कसा करावाव त्याचे फायदे तोटेछाटणी नंतर घडाची बाळी किंवा गोळी होणे तसेच फ्लॉवरिंग मध्ये घडकुज किंवा मनिगळ होणे याविषयी उपाययोजना व मार्गदर्शन केले.