इंडियन फार्मर्स फर्टीलायजर्स लिमिटेड (इफ्को) ने स्पष्ट केले आहे की, डिएपी आणि एनपीके खतांच्या किंमतीत वाढ करण्याचा विचार नाही.
इफ्कोचे व्यवस्थापकीय संचालक यु.एस. अवस्थी यांनी ट्वीट संदेशात म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात फॉस अॅसिड आणि इतर कच्च्या मालाच्या किंमतीत मोठी वाढ झाली असली तरीही आपण खतांच्या किंमतीत वाढ करणार नाही.
ते म्हणाले की, रब्बी हंगामात डीएपी व एनपीके खतांच्या एमआरपी वाढविण्याची कोणतीही योजना नाही कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्म निर्भर भारत घोषणेच्या अनुषंगाने कृषी खर्च कमी करून शेतकऱ्यांची सेवा करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. तसेच 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचेही ध्येय आहे.
इफ्को ही खतांचे उत्पादन आणि विपणन व्यवसायातील आघाडीची संस्था आहे. देशभरात कंपनीचे 5 उत्पादन प्रकल्प आहेत.