मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, काेकणात जाेरदार पावसाची शक्यता

ज्यात येत्या दोन दिवसांत तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. विदर्भ आणि तेलंगणा राज्यादरम्यान चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून नऊशे मीटर उंचीवर आहे. त्यामुळे रविवार (२० सप्टें.) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. तर सोमवरी (२१ सप्टें.) राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.

बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात रविवारी पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होण्याची शक्यता आहे. हे क्षेत्र बंगालच्या उपसागराच्या उत्तर पश्चिम भागाकडे सरकण्याची शक्यता आहे. याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होणार असून राज्यात काही प्रमाणात कमी झालेला पावसाचा जोर आणखी वाढणार आहे.