कोरोनातून रुग्ण बरे होण्यात भारत जगात पहिल्या स्थानावर

COVID-19 आजारातून बरे झालेल्या रुग्णांची भारतातील संख्या अमेरिकेला मागे टाकून पहिल्या स्थानावर

जागतिक पातळीवर अमेरिकेला मागे टाकत भारताने जागतिक covid-19  रोगमुक्तांची (रोगातून बरे झालेल्याची) संख्या सर्वात जास्त असणारा देश म्हणून स्थान मिळवले.

42 लाखापेक्षा जास्त (42,2,431) कोविड  रोगमुक्त या सर्वाधिक संख्येनिशी भारत हा रोगमुक्तांची आणि रुग्णालयातून सुट्टी मिळालेल्यांची संख्या अव्वल असणारा देश ठरला आहे. covid-19 रोगमुक्ताच्या जागतिक पातळीवरील  एकूण संख्येपैकी 19 टक्के संख्या ही भारतातील रोगमुक्तांची असल्याचे नोंदवण्यात आहे आहे. यामुळे जागतिक पातळीवरील रिकवरी दर हा 80 टक्क्यांवर (79.28) पोहोचला आहे.

रोगमुक्तांच्या संख्येत यामुळे थेट वाढ दिसून येत आहे.

केंद्राचे एकत्रित थेट आणि उपयुक्त प्रयत्न तसेच मोठ्या प्रमाणावरील चाचण्यांमधून रोगाचे सुरुवातीसच होणारे निदान, रुग्णांच्या संसर्गाचा माग काढणे आणि त्याबरोबरच उच्च दर्जाचे वैद्यकीय उपचार या सगळ्यांचा या जागतिक पातळीवरच्या यशात मोठा वाटा आहे.

covid-19 विरुद्ध एकत्रित आणि नेटाने दिलेल्या लढ्या बरोबरच भारताने दिवसभरातील रोगी बरे होण्याच्या संख्येतही गेल्या चोवीस तासात ही संख्या सर्वाधिक असल्याची नोंद केली आहे, गेल्या 24 तासात 95,880 रुग्ण आजारातून मुक्त झाल्याची नोंदवले गेले.

रोगमुक्ताच्या एकूण संख्येपैकी पैकी 90 टक्के संख्या ही 16 राज्ये/ केंद्रशासित प्रदेश या मधली असल्याचे नोंदवण्यात आले आहे.

नवीन रोगमुक्ताच्या संख्येपैकी 60 टक्के संख्या ही पाच राज्ये म्हणजेच महाराष्ट्र , तामिळनाडू,  आंध्र प्रदेश , कर्नाटक आणि उत्तर प्रदेश यातील आहे.

फक्त महाराष्ट्रात 22,000 म्हणजे 23 टक्‍के आंध्रप्रदेशात 11,000 म्हणजे 12.3 टक्के एवढी दिवसभरातील रोगमुक्तांची संख्या आहे.

एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांपैकी 90 टक्के संख्या ही 15 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आहे.

जास्तीत जास्त रुग्णांची संख्या असलेली पाच राज्ये म्हणजे महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश, ही सर्वात जास्त रोगमुक्तांची संख्या असलेली ही राज्ये आहेत.

भारताने सर्वात जास्त रोगमुक्तांच्या संख्येची वाट अखंड राखली आहे. लक्ष्य प्राप्तीच्या दृष्टीने आखलेली धोरणे ,सहकार्याने केलेल्या राज्यांतील परिणामकारक उपाय योजना यामुळे हे शक्य झाले. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने देखभाल तसेच उपचारांची एक आदर्श पद्धत ठरवून दिली. जागतिक पातळीवरील मिळणारे परिणाम यानुसार ही पद्धत नियमितपणे सुधारण्यात आली आणि अधिक नेमकी करण्यात आले. भारताने  रॅम्डेस्वीर ,प्लाज्मा उपचार पद्धती तसेच tocilizumab आणि इतर पद्धती जसे की प्रोनिंग, ऑक्सिजनचा थेट वापर , व्हेंटिलेटरचा योग्य तिथेच वापर आणि रक्तात गुठळ्या न होण्यासाठी दिली जाणारी औषधे अशा विविध  रोगनिदानाच्या उपचारपद्धतीचा विवेकी दृष्टीने वापर करण्यास दिलेली अनुमती ही कोविड रुग्णांना बरे होण्यासाठी सहाय्यभूत ठरली.

सामान्य आणि मध्यम लक्षणांच्या रुग्णांना मार्गदर्शनाखाली गृह विलगीकरण किंवा अलगीकरणाची दिलेली सुविधा तसेच रुग्णांना तत्परतेने उपलब्ध करून दिलेली रुग्णवाहिका सेवा आणि वेळेवर मिळालेले उपचार यामुळे रुग्णांना परिणाम कारक आणि योग्य उपचार मिळणे शक्य झाले.

एम्स , नवी दिल्ली या संस्थेने राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या  उपचार पद्धतीत सुधारणा करण्यासाठी तसेच वैद्यकीय उपचारातील परिणामकारकता, ICU मधल्या डॉक्टरांच्या कौशल्यातील सुधारणा यासाठी  covid-19 व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय ई-आयसीयू व्यवस्थापन या कार्यक्रमातून मार्गदर्शन केले. दर आठवड्याला मंगळवारी आणि शुक्रवारी भरणाऱ्या या कार्यक्रमामुळे देशभरात रोगमुक्तांच्या संख्येत वाढ आणि मृत्यूदर कमी राखण्यास  मदत झाली.

देशभरातून एकोणीस राष्ट्रीय e- ICU चे कार्यक्रम करण्यात आले, त्याचा 28 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 249 रुग्णालयांनी आजपर्यंत लाभ घेतला आहे.

राज्य तसेच केंद्रशासित प्रदेश व्यवस्थापनाला मिळणार्‍या सहाय्यावर केंद्र सरकार सातत्याने देखरेख करत आहे.

राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशात अनेक उच्चस्तरीय अनेक क्षेत्रातील तज्ञांच्या मंडळे पाठवण्यात आली. यामुळे ती राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांना कंटेनमेंट , संसर्ग पाळत, चाचण्या आणि योग्य औषधोपचार व्यवस्थापन यासाठी मदत मिळाले रुग्णालये तसेच आरोग्य केंद्रात वैद्यकीय ऑक्सिजन उपलब्ध व्हावा यासाठी केंद्र सातत्याने आढावा घेत आहे यामुळेच महत्त्वाचा सर्वोच्च रोगमुक्तांच्या संख्येचा परिणाम साधता आला, आणि मृत्यू दरातही लक्षणीय घट राखता आली . सध्या मृत्युदर 1.61 टक्के एवढा आहे.