देशात सक्रिय रुग्णांपेक्षा चौपट रुग्ण कोरोनातून बरे

बरे झालेल्या नवीन रुग्णांमध्ये एक चतुर्थांश एकट्या महाराष्ट्रातील

रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात भारताने सातत्याने नवा उच्चांक नोंदविला आहे. एका दिवसात सर्वाधिक रुग्ण बरे होण्याची नोंद गेल्या 24 तासांत भारताने केली आहे. कोविडचे 82,961 रूग्ण बरे झाले असून त्यांना गृह/ विलगीकरण सुविधा केंद्रातून तसेच रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. याद्वारे रुग्ण बरे होण्याचा दर 78.53% वर पोहोचला आहे.

रुग्ण बरे होण्याची साप्ताहिक सरासरी ही बरे होण्याच्या प्रमाणातील सातत्यपूर्ण वाढ दर्शविते.

गेल्या 24 तासात कोविडचे 82,961 रुग्ण बरे झाले आणि हा एका दिवसातील रुग्ण बरे होण्याचा नवा उच्चांक आहे.

एकूण 39,42,360 रुग्ण बरे झाले आहेत.

गेल्या 24 तासात कोविडचे नवीन रुग्ण बरे होण्यात महाराष्ट्राचा वाटा 23.41% म्हणजे (19423) तर आंध्र प्रदेश (9628), कर्नाटक (7406), उत्तर प्रदेश (6680) आणि तामिळनाडू (5735) या राज्यांचा मिळून वाटा 35.5% आहे.

या पाच राज्यात मिळून सुमारे 59% नवीन रुग्ण बरे झाले.

27 राज्ये / केंद्रशासित प्रदेशात रुग्ण बरे होण्याचा दर 70% पेक्षा जास्त आहे.

आजपर्यंत देशात 9,95,933 सक्रिय रुग्ण आहेत.

बरे होणारे आणि सक्रिय रुग्ण यातील तफावत आज 29 लाखांच्या पुढे गेली आहे (29,46,427). बरे होणाऱ्यांचे प्रमाण सक्रिय रुग्णांच्या जवळपास चौपट (3.96) आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडूमध्ये जवळपास 60% सक्रिय रुग्ण आहेत.

एकूण सक्रिय प्रकरणांपैकी 70% प्रकरणे ही नऊ सर्वात जास्त प्रभावित राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये आढळतात.

गेल्या 24 तासात देशात 90,123 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

गेल्या 24 तासांत 20,000 हून अधिक नवीन रुग्णांसह महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ आंध्र प्रदेश (8846) आणि कर्नाटक (7576) यांचा क्रमांक लागतो.