मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी रब्बी शेतकरी मेळाव्याचे व बियाणे विक्रीचे आयोजन करण्यात येते. परंतु या वर्षी कोविड १९ विषाणुच्या संसर्ग मोठया प्रमाणात वाढल्यामुळे सामाजिक आंतरीकरणाचे पालन होण्याच्या दृष्टीने या वर्षीचा १७ सप्टेंबरचा रबी शेतकरी मेळावा ऑनलाईन पध्दतीने होत आहे.
मराठवाडयातील शेतक-यांना विद्यापीठ उत्पादीत हरभरा, करडई, गहु, जवस, सुर्यफुल, रबी ज्वार आदी पिकांच्या वाणांचे बियाणांचा रबी हंमागात पेरणीसाठी लाभ घेता यावा या अनुषंगाने केवळ परभणी मुख्यालयी विक्री व्यवस्था न ठेवता, मराठवाडा विभागातील प्रत्येक जिल्हयात विद्यापीठांतर्गत असलेल्या कृषि विज्ञान केंद्रे, संशोधन केंद्र आदी ठिकाणी करण्यात येणार आहे.
विद्यापीठ अंतर्गत असलेल्या औरंगाबाद, बदनापुर (जालना), खामगांव (बीड), तुळजापुर (उस्मानाबाद) येथील कृषि विज्ञान केंद्रे तसेच लातुर येथील गळीत धान्य संशोधन केंद्र, नांदेड येथील कापुस संशोधन केंद्र, गोळेगांव (हिंगोली) येथील कृषि महाविद्यालय व परभणी येथील बीज प्रक्रिया केंद्रात सप्टेबर महिन्याच्या शेवटच्या आठवडयात बियाणे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असुन शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.