शेतकऱ्याच्या कर्जमुक्तीसाठी कृषी धोरणातून प्रयत्न

विधान सभा अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले, त्यात शेती आणि शेतकरी यांचाही मुद्दा होता. त्यातील निवडक वाचकांसाठी देत आहोत.

मुख्यमंत्री महोदयांच्या विधान सभेतील निवेदनातील मुद्दे

  1. हे दोन दिवसांचे अधिवेशन शांततेत पार पडले. या अधिवेशनात आरोग्याचे नियम पाळले.
  2. महाराष्ट्रातील जनतेला, सर्व धर्मीय जनतेला धन्यवाद देतो आहे. हे संकट म्हणजे विषाणु विरोधातील युद्ध आहे. खांद्याला खांदा लावून एकत्रितपणे आपण लढा देतो आहोत. मार्च, एप्रिल, मे मध्ये रुग्ण संख्येची वाढ मर्यादीत ठेवू शकलो. अजूनसुद्धा कोरोनाचे संकट लवकर जाईल, असे दिसत नाही.
  3. जागतिक आरोग्य संघटनेने करोनाचे संकट लवकर जाणार नाही, अशा इशारा दिला आहे. यापुढेही येणाऱ्या महामारीला सामोरे जावे लागेल, असे सांगितले आहे. यापुढेही आपल्याला जपून पावले टाकावे लागेल. दक्षता घ्यावी लागेल. गाफील राहून चालणार नाही.
  4. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोरोना बाबत जनजागृतीच्या ज्या- ज्या सुचना केल्या, त्या सुचनांचे पालन केले. गेल्या पाच सहा महिन्यांत बरेच बदल झाले आहेत. आता आपल्या तोंडाला पट्ट्या आल्या आहेत. एकमेकांपासून अंतर ठेवून बसलो आहोत. वारंवार हात धुत आहोत. या सूचना तळागाळात नेण्याची आवश्यकता आहे.
  5. पुनश्च हरिओम म्हणून सुरवात करीत आहोत. मिशन बिगन अगेन मध्ये
  6. अर्थचक्र पुढे चालू राहण्यासाठी, त्याला गती देण्यासाठी अनेक गोष्टी केल्या आहेत.
  7. साडे एकोणतीस लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू शकलो. साडे सहा लाख आदिवासी बालकांना आणि महिलांना मोफत दुध भुकटी देतो आहोत.
  8. शेतकऱ्याला कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्याच्या दृष्टीने कृषी धोरणाच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहोत.
  9. मुंबईकरासाठी आपण इतर काही गोष्टी आणतो आहे. आपल्याकडे धनसंपत्ती आणि जनसंपत्ती आहे, तशी आपल्याकडे वनसंपत्ती आहे.
  10. काम करताना इगो नको असे आपण म्हणता, परंतू काम करताना शार्ट कटही मारता कामा नये. आरे कार शेडच्या बाबतीत तज्ज्ञांना सोबत घेऊन काम करतो आहोत. जो खर्च झाला आहे, तो वाया जाऊ नये याचा विचार करून पावले टाकत आहोत.
  11. आरेमधील सहाशे एकर जमीन आपण जंगलासाठी राखीव ठेवत आहोत. संपूर्ण जगात कुठेही नाही, असे हे महानगराच्या मध्यभागी असलले जंगल असेल. याठिकाणी वन्यजीव देखील असतील. देशातील कुठल्याही राष्ट्रीय उद्यानात वन्यजीव नाहीत.
  12. मुंबईसाठी इतर सोयी सुविधा देत असताना, मुंबईच्या पर्यावरणासाठी सहजीवनासाठी ही संपदा जोपासणे आवश्यक आहे.
  13. कोविड संकट वाढते आहे. रुग्ण संख्या वाढते आहे. सरकार म्हणून खंबीरपणे पाऊल टाकतो आहोत. मार्चमध्ये केवळ तीन प्रयोगशाळा होत्या. आता जवळपास पाचशे तीस प्रयोगशाळा सुरु केल्या आहेत.
  14. आजपर्यंत आरोग्य हा विषय मागे पडला होता. करोनाच्या संकटातून बऱ्याच काही चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. मुंबईबरोबरच राज्यात आरोग्याच्या कायमस्वरुपी सोयी उभ्या केल्या जातील.
  15. आतातरी आपल्या हातामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे हेच हातात आहे. सगळ्या गोष्टी कायद्याने करता येत नाही. जनतेला त्यांचे हित कशात आहे, हे नीटपणे सांगू शकलो, राज्यात तज्ज्ञ डॉक्टर्सचे टास्क निर्माण केले. जिल्ह्यांमध्ये देखील असे टास्क फोर्स नेमले आहेत.

माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम

  1. · कोरोना विषाणुला रोखण्यासाठी मोहीम. आशा स्वयंसेविका, वैद्यकीय सहायक, गट प्रवर्तक, आणि एकूणच या क्षेत्रातील सर्वांच्या सहभागाने एक राज्यव्यापी मोठी मोहीम.
  2. · यात पहिल्या टप्प्यात १५ सप्टेंबरपासून १० ऑक्टोबरपर्यंत घरोघर आरोग्य चौकशी केली जाईल, तपासणी नव्हे.
  3. · दुसऱ्या टप्प्यात १२ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. एका महिन्याच्या कालावधीत दोनवेळा हे स्वयंसेवक प्रत्येक कुटुंबाला भेटणार
  4. · पहिला फेरीचा कालावधी २२ दिवसांचा तर दुसरा १२ दिवसांचा असेल.
  5. · यात घरातील कुटुंबांच्या आरोग्याविषयी जाणून घेतले जाईल, त्यांना इतर कोणते आजार आहेत का? हाय रिस्क गटातील,वयस्क, यांना असलेले आजार ? हृदयविकार, मधुमेह, किडणी, लठ्ठपणा यासारख्या आजार असणाऱ्या व्यक्ती शोधण्यात येतील. या व अनुषंगाने इतर आरोग्य विषयक माहिती विचारण्यात येणार आहे.
  6. · ही मोहीम सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत इत्यादी ठिकाणी राबविली जाऊन गावे, वाडी, पाडे येथील प्रत्येक नागरिकाची तपासणी करण्यात येईल.
  7. · महानगरपालिका व नगरपालिकांमध्ये नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण भागामध्ये तेथील प्राथमिक आरोग्य केंद्र याचे नियोजन करतील.
  8. · दोन कर्मचाऱ्यांचे / स्वयंसेवकांचे एक पथक असेल. हे पथक एका दिवसात ५० घरांना भेटी देईल. या पथकामध्ये एक शासकीय कर्मचारी, आशा आणि दोन स्थानिक स्वयंसेवक असतील. हे स्वयंसेवक सरपंच, नगरसेवक यांनी निश्चित करावयाचे आहे.
  9. · ही लोकांची मोहीम राहणार आहे. यात सरपंच, नगरसेवक यांच्यावरही जबाबदारी असेल.
  10. · मोहीम सार्वजनिक आरोग्य, नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग, महिला व बालकल्याण विभाग यांच्या मार्फत चालविली जाईल.
  11. · आरोग्य विषयक जनजागृती करण्यासाठी विद्यार्थी,पालक, सामान्य व्यक्तींसाठी निबंध स्पर्धा, संदेश स्पर्धा इत्यादी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून विजेत्यांना पारितोषिकेही दिली जाणार आहेत. विविध संस्थांसाठी ही बक्षीस योजना राबविण्यात येईल.
  12. · जिल्हा स्तरावर नागरी आणि ग्रामीण असे दोन विभाग असतील. प्रत्येक विभागात पहिल्या तीन संस्था निवडण्यात येऊन त्यांना गुणांच्या आधारे बक्षीस दिले जाईल.
  13. · विद्यार्थी, पालक, सामान्य व्यक्ती यांना देखील बक्षीसे देण्यात येतील.
  14. · गावोगावच्या दक्षता समित्या, स्वयंसेवी संस्था यांना मोहिमेस मदत करण्याचे आवाहन.
  15. आपला महाराष्ट्र हा देशातील आदर्श असे राज्य ठरेल. जिथे जनतेने पुढाकार घेऊन या संकटावर मात केलेली असेल. मी आपणास या मोहिमेमध्ये सहभागी होऊन यशस्वी करण्याचे आवाहन करतो.