प्रति दशलक्ष चाचण्यांमध्ये सातत्याने वाढ, आज 36,703 वर
आक्रमक आणि व्यापक चाचण्यांनी कोविड महामारीविरोधात भारताच्या लढ्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. भारताने एकूण चाचण्यांचा 5 कोटींचा टप्पा आज पार केला. जानेवारी 2020 मध्ये पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेतून फक्त एक चाचणी घेण्यापासून भारताने आतापर्यन्त बरीच मजल मारली असून आज ही एकूण संख्या 5,06,50,128 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात 10,98,621 चाचण्या घेण्यात आल्या ज्यातून भारताची वाढीव चाचणी क्षमता दिसून येते.
सरासरी दैनंदिन चाचण्या (आठवड्यानुसार) सातत्याने वाढ दर्शवत आहेत. जुलैच्या तिसर्या आठवड्यापासून (निदान प्रयोगशाळांच्या नेटवर्कच्या विस्तारीकरणामुळे प्रति दशलक्ष चाचण्यांना चालना मिळाली आहे.
टीपीएममध्ये 1 जुलै रोजीच्या 6396 वरून आज 36,703 पर्यंत वाढ झाली आहे. देशातील चाचणी प्रयोगशाळेचे नेटवर्क निरंतर बळकट झाले असून आज देशात 1668 प्रयोगशाळा आहेत; सरकारी क्षेत्रात 1035 प्रयोगशाळा आहेत तर खाजगी 633 प्रयोगशाळा आहेत. यामध्ये :
• रिअल-टाइम आरटी पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा : 846 (सरकारी 467 + खासगी: 379))
• ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा : 700 (सरकारी : 534 + खाजगी: 166)
• सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा :122 (सरकारी: 34 + खासगी: 88)3,26,971) ते सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत (10,46,470) 3.2 पट वाढ झाली आहे.