शरद पवार देणार पुण्यासाठी 6 कार्डियाक अँम्ब्युलंस

पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. पत्रकार पांडुरंग रायकर याचाही कार्डियाक अँम्ब्युलंस न मिळाल्याने उपचाराअभावी नुकताच मृत्यू झाला. या प्रकरणाची राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी सविस्तर माहिती घेतली. अशी घटना पुन्हा घडू नये, यासाठी पवारांनी तीन दिवसात सहा कार्डियाक अॅम्ब्युलंस  उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.

पुण्यातील बारामती होस्टेल येथे पवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील लोक प्रतिनिधींची आढावा बैठक घेतली.  यावेळी पवार यांनी कोरोनाचे संकट कमी करण्यासाठी अनेक महत्वपूर्ण सूचनाही केल्या. कोरोनाचे आणखी १५० इंजेक्शन उपलब्ध करून देणार असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले. ग्रामीण भागातील कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या रुग्णांवर उपचार होण्यासाठी ते ससून हॉस्पिटल आणि जम्बो होपितल येथे दाखल होत आहेत.

शहराच्या ५२ लाख लोकसंख्येच्या प्रमाणात केवळ तीनच कार्डियाक अॅम्ब्युल्स  उपलब्ध आहेत. त्यातील एक बंद आहे. त्याची दाखल घेऊन तातडीने ६  कार्डियाक अॅम्ब्युल्स  देणार असल्याचे पवार यांनी जाहीर केले.